भारतीय संघाचा युवा फलंदाज श्रेयस अय्यर हा मागील काही महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. कारण मार्च २०२१ मध्ये झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेदरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला आयपीएलच्या १४ व्या हंगामाला मुकावे लागले होते. याच दरम्यान त्याने त्याच्या खांद्याच्या दुखापतीवर उपचार केले आणि दुखापतीतून बरे होण्यासाठी क्रिकेटपासून विश्रांती घेतली होती. दुखापत झाल्यामुळे श्रीलंका दौऱ्यावरही त्याची निवड झाली नव्हती. परंतु मागील काही दिवसांपासून त्याने पुन्हा एकदा सराव सुरू केला आहे.
सध्या श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्स संघाच्या शिबिरात सहभागी झाला आहे. तो दिल्लीचे फलंदाजी प्रशिक्षक प्रवीण आमरे यांच्याकडून फलंदाजीचे प्रशिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सने श्रेयस अय्यर आणि प्रवीण आमरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये दोघे फलंदाजीबद्दल बोलत आहेत. त्यानंतर श्रेयस अय्यरने फलंदाजीचा सराव करताना काही शॉर्ट बॉलवर अप्रतिम शॉट्स मारलेले दिसून येत आहेत. या व्हिडिओमध्ये श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट दिसत आहे.
📹 | @ShreyasIyer15 training hard and getting back in the groove has us as excited as a kid 🤩#YehHaiNayiDilli @pravin__amre pic.twitter.com/Da2CDmij2x
— Delhi Capitals (@DelhiCapitals) July 31, 2021
हा व्हिडिओ पोस्ट करताना दिल्ली कॅपिटल्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘श्रेयस अय्यर पुन्हा एकदा कसून सराव करत आहे. त्याचबरोबर तो पुनरागमन करण्यासाठी खूप उत्सुक आहे, जसा एखादा लहान मुलगा असतो अगदी तसा.’ दिल्ली कॅपिटल्सच्या या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांनीही कमेंट करून त्याच्या परत येण्याबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. श्रेयस अय्यरने काही दिवसांपूर्वी सराव करताना दोन बॅट देखील तोडल्या होत्या, ज्याचा फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला होता.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान श्रेयस अय्यरने पुन्हा संघाचे कर्णधार होण्याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबद्दल तो म्हणाला की, “संघ व्यवस्थापन याबाबत निर्णय घेणार आहे. मी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. माझ्या नेतृत्वाखाली संघाने गतवर्षी प्लेऑफ आणि अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला होता. पण आयपीएल २०२१ च्या आधी मला झालेल्या दुखापतीमुळे रिषभ पंतला माझ्याजागी कर्णधार बनवण्यात आले. त्याने देखील संघाचे चांगले नेतृत्व चांगले केले होते.”
महत्त्वाच्या बातम्या-
निकोलस पुरनची चिवट झुंज व्यर्थ, दुसऱ्या टी२०त पाकिस्तानचा वेस्ट इंडिजवर ७ धावांनी विजय
चला जरा फिरूया! मायदेशी परतताच ‘या’ खास ठिकाणाला धवनने दिली भेट; चाहत्यांसोबत फोटोही काढले