---Advertisement---

BCCIचा मास्टरप्लॅन! गोलंदाजांची झोप उडवणारा ‘हा’ फलंदाज टीममध्ये परतणार

On: शुक्रवार, मे 23, 2025 1:11 PM
cheteshwar pujara shreyas iyer
---Advertisement---

येत्या 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय निवड समिती उद्या म्हणजेच शनिवारी टीम इंडियाची घोषणा करणार आहे. या कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय मोठा निर्णय घेऊ शकते. भारताच्या सर्वात धोकादायक फलंदाजाला कसोटी संघात स्थान मिळवून देऊ शकते. इंग्लंडच्या संघाला भारताच्या या फलंदाजापासून मोठा धोका असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची हाय-प्रोफाइल कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होणार आहे. दोन्ही देशांमधील कसोटी मालिका 20 जून ते 4 ऑगस्ट दरम्यान खेळवली जाईल.

टीम इंडियाचा हा फलंदाज संघासाछी ब्रह्मास्त्र ठरेल. टीम इंडियाचा हा खेळाडू जेव्हा क्रिजवर येतो तेव्हा इंग्लंडच्या गोलंदाजांमध्ये भीतीची लाट पसरते. टीम इंडियाचा हा ब्रह्मास्त्र दुसरा तिसरा कोणी नसून स्टार फलंदाज श्रेयस अय्यर आहे. श्रेयस अय्यर एक वर्षानंतर भारताच्या कसोटी संघात परतू शकतो. श्रेयस अय्यरने 2 फेब्रुवारी 2024 रोजी इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी क्रमांक-4 वर फलंदाजी करू शकतो. श्रेयस अय्यर कसोटी संघात विराट कोहलीची जागा भरून काढू शकतो. श्रेयस अय्यरकडे वेगवान गोलंदाज आणि फिरकी गोलंदाजांना तोंड देण्याची अद्भुत तंत्रे आहेत. श्रेयस अय्यर टीम इंडियासाठी क्रमांक-4 वर फलंदाजी करून एक्स-फॅक्टरची कमतरता भरून काढू शकतो. श्रेयस अय्यरकडे कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक आणि त्रिशतक झळकावण्याची क्षमता आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिला कसोटी सामना – 20 जून ते 24 जून, दुपारी 3.30 वा, हेडिंग्ले (लीड्स)

दुसरा कसोटी सामना – 2 जुलै ते 6 जुलै, दुपारी 3.30 वा, एजबॅस्टन (बर्मिंगहॅम)

तिसरा कसोटी सामना – 10 जुलै ते 14 जुलै, दुपारी 3.30 वा, लॉर्ड्स (लंडन)

चौथा कसोटी सामना – 23 जुलै ते 27 जुलै, दुपारी 3.30 वा, ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर)

पाचवा कसोटी सामना – 31 जुलै ते 4 ऑगस्ट, दुपारी 3.30 वा, केनिंग्टन ओव्हल (लंडन)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---