---Advertisement---

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयरमध्ये दोन भारतीयांना संधी, बाबर आझम बनला कर्णधार

babar Azam Virat Kohli
---Advertisement---

मंगळवारी (24 जानेवारी) आयसीसी मागच्या वर्षी सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या खेलाडूंचा वनडे संघ निवडला आहे. वनडे फॉरमॅटमध्ये मागच्या वर्षभरात श्रेयस अय्यर जबरदस्त प्रदर्शन करताना दिसला, तर वेगावान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील संघासाठी काही सामन्यांमध्ये मॅच विनर ठरला. या दोघांच्या प्रदर्शनचा विचार करून आयसीसीने वनडे टीम ऑफ द ईयर 2022 मध्ये निवडले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर 2022 चा कर्णधार निवडले गेले आहे. 

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर 2022-
बाबर आझम (कर्णधार), ट्रेविस हेड, शाय होप, श्रेयस अय्यर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), सिकंदर रझा, मेहदी हसन मिराझ, अ्लझारी जोसेफ, मोहम्मद सिराज, ट्रेंट बोल्ड, एडम झंपा.

मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) याने भारतीय संघासाठी मागच्या वर्षी सर्वोत्तम वनडे प्रदर्शन प्रदर्शन केले. सिराजने 2022 या संपूर्ण वर्षात एकूण 15 वनडे सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 122 षटके गोलंदाजी केली आणि 24 विकेट्स घेतल्या. त्याचे एका सामन्यात 29 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या, जे त्याचे सर्वोत्तम पदर्शन ठरले. यादरम्यान सिराजचा इकॉनॉमी रेट अवघा 4.62 होता. या आकडेवारीच्या जोरावर सिराजने वर्षातील सर्वोत्तम वनडे संघातही (ICC ODI Team of the Year) स्वतःची जागा बनवली.

भारतीय फलंदाजांचा विचार केला, तर यात श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सर्वात अप्रतिम ठरला. श्रेयसने मागच्या वर्षभरात 17 वनडे सामने खेळले, ज्यातील 15 सामन्यांमध्ये त्याला फलंदाजीची संधी मिळाली. या 15 डावांमध्ये श्रेयसने 55.69 च्या सरासरीने आणि 91.52 च्या सरासरीने 791 धावा केल्या. 113 धावा ही त्याची मागच्या वर्षातील सर्वात वनडे मोठी खेळी होती. आयसीसीने या संघात निवडलेल्या 11 खेलाडूंनी स्वतःच्या संघासाठी सर्वोत्तम प्रदर्शन केले आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) मागच्या काही महिन्यांमध्ये फॉर्ममध्ये नसला, तरी वर्षाच्या सुरुवातील त्याने संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. याच जोरवार बाबर वनडे टीम ऑफ द ईयरमध्ये समील झाला आणि संघाचा कर्णधार देखील बनला. बाबर आझमने मागच्या वर्षी पाकिस्तान संघासाठी वनडे क्रिकेटमद्ये 84.87 च्या सरासरीने धावा केल्या. बाबारने मागच्या वर्षी एकूण 9 वनडे सामने खेळले आणि यात 90.77 च्या स्ट्राईक रेटने 679 धावा केल्या. 114 ही त्याची सर्वात मोठी खेळी राहिली. (Shreyas Iyer & Mohammed Siraj are the Indians in the ICC Men’s ODI team of the year.)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
द्रविडकडून रोहित शर्मावर कौतुकाचा वर्षाव, वनडेमध्ये सलामीवीराच्या रूपात गाठला यशाचा मोठा टप्पा
पोरी एक पाऊल पुढे! 2022 आयसीसी टी20 संघात स्मृतीसह तब्बल चार भारतीय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---