---Advertisement---

गांगुली म्हणतोय, ‘पदार्पणात चांगली कामगिरी असली, तरी श्रेयस अय्यरची खरी परिक्षा…’

On: शनिवार, डिसेंबर 18, 2021 8:11 AM
Shreyas-Iyer-Sourav-Ganguly
---Advertisement---

न्यूजीलंडविरुद्ध मायदेशात खेळलेल्या टी२० आणि कसोटी मालिकेत विजय मिळवून भारतीय संघ (Team India) दक्षिण अफ्रिकेत दाखल झाला आहे. भारताला दक्षिण अफ्रिका दौऱ्यात तीन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताचा युवा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला संघात सामील केले गेले आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या मते श्रेयस अय्यरची खरी परीक्षा या दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (South Africa tour of India) असणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत श्रेयस अय्यरने त्याचे कसोटी पदार्पण केले होते. पदार्पण सामन्यात त्याने भारताचे प्रतिनिधित्व करताना अप्रतिम फलंदाजी करून दाखवली होती. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात त्याने पहिल्या डावात शतक केले होते, तसेच दुसऱ्या डावात ६५ धावांची खेळी केली होती. परंतु न्यूझीलंड संघ हा सामना अनिर्णीत करण्यात यशस्वी ठरला होता.

अय्यरचे कसोटी पदार्पण अप्रतिम झाले असले तरी, दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्याची खरी परीक्षा असणार आहे, असे मत बीसीसीआय अध्यक्ष आणि भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी व्यक्त केले.

सौरव गांगुली ‘बॅकस्टेज विथ बोरिया’ कार्यक्रमात अय्यर आणि दक्षिण अफ्रिका दौऱ्याविषयी मत मांडले आहे.  ते म्हणाले की, “मला वाटते की अय्यरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मोठ्या काळापासून ५० ची सरासरी राखली आहे. मी त्याची प्रथम श्रेणी सरासरी पाहिली, ती १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून ५२ ची होती आणि हे करण्यासाठी तुम्ही सामन्य असू शकत नाही.”

“मी खूप आनंदी आहे की, त्याने पहिल्या कसोटी सामन्यात चांगले प्रदर्शन केले, पण त्याची खरी परीक्षा तेव्हा होईल, जेव्हा तो दक्षिण अफ्रिकेत खेळेल. जेव्हा तो दक्षिण अफ्रिका आणि इंग्लंडला जाईल, आशा आहे की तो तेथे गती आणि बाउंसपुढे मजबूतीने उभा राहील आणि प्रदर्शन करेल,” असे गांगुली म्हणाले.

अय्यने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्याच्या कसोटी मालिकेत ५० पेक्षा जास्त सरासरीने २०२ धावा केल्या आणि तो या मालिकेत दुसरा सर्वाधिक करणारा खेळाडू ठरला होता. मयंक अगरवालने या मालिकेत २४२ धावा केल्या होत्या आणि सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिकेत हे दोन्ही खेळाडू भारताच्या ताफ्यात सामील आहेत. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबर पासून खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या –

थोडक्यात स्टेडियमबाहेर जाण्यापासून हुकला विंडिज फलंदाजाचा चेंडू; पुढे पाकिस्तानी गोलंदाजाने जे केले, ते पाहाच

आली लग्न घटीका समीप..! मॅक्सवेलच्या विवाहाची तयारी झाली सुरू? होणाऱ्या नवरीने शेअर केला पत्रिकेचा फोटो

टीम इंडियाचा ‘आफ्रिकी पाहुणचार’, ६० हेक्टरमध्ये परसलेल्या आलिशान रिसॉर्टमध्ये आहे विराट अन् कंपनीचा डेरा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---