ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून श्रेयस अय्यर याने माघार घेतली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार श्रेयस अय्यर दुखापतीच्या कारणास्तव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीये. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्श क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
पाठिच्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून देखील त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. अशातच आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून देखील त्याला माघार घ्यावी लागत आहे. श्रेयस अय्यर संघातून बाहेर झाल्यानंतर त्याची जागा भरण्यासाटी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि शिबमन गिल (Shubman Gill) यांच्यात स्पर्धा सुरू असल्याचे दिसते. सूर्यकुमारला मध्यक्रमात खेळण्याच अनुभव असल्यामुळे त्याला अधिक प्रधान्य मिळण्याचीही शक्यता आहे. कसोटी मालिकेत रोहित शर्मा आणि केएल राहुल भारताच्या डावाची सुरुवात करतील.
समोर आलेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी पूर्णपणे फिट होणे अपेक्षित होते, मात्र तसे होऊ शकले नाही. बीसीसीआयच्या एका सूत्राकडून असी माहिती मिळाली की, “जेव्हा न्यूझीलंड संघ 2021 च्या शेवटी भारत दौऱ्यावर आला होता, तेव्हा शुबमन गिल याला मद्यक्रमात खेळवण्याचा विचार केला गेला होता. तेव्हा केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांनी डावाची सुरुवात करणार होते. नंतर राहुलला दुखापत झाली आणि गिल शुबमन गिलने डावाची सुरुवात केली. तेव्हापासून गिल कसोटी फॉरमॅटमध्ये डावाची सुरुवात करत आला आहे.”
“अशात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी रोहित शर्मा आणि केएल राहुल डावाची सुरुवात करण्यासाठी पहिली पसंती असतील. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात. पाचवा क्रमांक संघासाठी महत्वाचा असतो, कारण दुसरा नवीन चेंडू घेतल्यानंतर पाचव्या क्रमांकाच्या फलंदाजाकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असते. श्रेयस अय्यर या भूमिकेत फिट होता.”
भारतीय संघाच्या एका माजी निवडकर्त्यांनी देखील याविषयी मत व्यक्त केले. त्यांच्या मते, “राहुल द्रविडने जेव्हा भारत अ संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले, तेव्हा वेस्ट इंडीज दौऱ्यावर गिल संघासाठी मध्यक्रमात खेळला होता. याठिकाणी गिलने कसोटी मालिकेत एक द्विशतक ठोकले होते. तो मुळात मध्यक्रमातील फलंदाज आहे, पण नंतर त्याला सलामीवीर बनवले गेले.” अशात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात संघ व्यवस्थापन सूर्यकुमार आणि गिल यांच्यातील कोणाला संधी देते, हे पाहण्यासारखे असेल. सूर्यकुमारचे नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले गेले, तर हे त्याचे कसोटी पदार्पण असेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
9-13 फेब्रुवारी – पहिला कसोटी सामना
17-21 फेब्रुवारी – दुसरा कसोटी सामना
1-5 मार्च – तिसरा कसोटी सामना
(Shreyas Iyer Ruled Out from the Test series against Australia. One of Suryakumar Yadav and Shubman Gill may get a chance)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएलच्या सर्वात महागड्या खेळाडूवर आयसीसीची मोठी कारवाई, धक्कादायक कारण आलं समोर
मॅचविक १७मध्ये मुंबई सिटी एफसीचा ऐतिहासिक विजय, प्लेऑफच्या शर्यतीत बंगळुरू एफसी कायम