---Advertisement---

ब्रेकिंग! टीम इंडियाला मोठा झटका, प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर, ‘या’ खेळाडूचा समावेश

On: मंगळवार, जानेवारी 17, 2023 2:39 PM
Team-India
---Advertisement---

भारतीय संघासाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा दमदार फलंदाज श्रेयस अय्यर हा न्यूझीलंड संघाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी एक दिवस आधीच संघाबाहेर पडला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे मधल्या फळीतील स्टार फलंदाज श्रेयस वनडे मालिकेला मुकणार आहे. त्याच्या जागी रजत पाटीदार या खेळाडूला भारतीय ताफ्यात सामील करण्यात आले आहे.

श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून बाहेर पडल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. बीसीसीआयने एक निवेदन जारी केले आहे. तसेच, त्यात सांगितले आहे की, श्रेयसला बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे उपचारासाठी पाठवले आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील पहिला वनडे सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअममध्ये होणार आहे. (shreyas iyer ruled out of india vs new zealand odi series due to back injury)

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी भारताचा सुधारित संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रजत पाटीदार, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---