---Advertisement---

परफेक्ट जोडी! दुखापतीतून सावरत असलेला श्रेयस अय्यर आपल्या ‘खास’ मित्रासोबत घालवतोय वेळ, बघा फोटो

On: शुक्रवार, मे 21, 2021 10:09 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध मार्चमध्ये झालेल्या एकदिवसीय मालिकेतील खांद्याच्या दुखापतीमुळे क्रिकेट मैदानापासून दूर आहे. आयपीएल 2021 मध्ये देखील त्याला या दुखापतीमुळे खेळता आले नव्हते. त्यामुळे श्रेयस अय्यर सध्या आपल्या घरी वेळ घालवत आहेत. यादरम्यान त्याला आपल्या पाळीव कुत्र्यासोबत वेळ घालवण्यास मिळत आहे. श्रेयसने नुकताच त्याच्या कुत्र्यासोबतचा फोटो सोशल मिडीयात शेयर केला आहे.

श्रेयसने आपल्या कुत्र्यासोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेयर करत कॅप्शन लिहिले, “माय पोम पोम “. श्रेयसचा हा फोटो नेटकऱ्यांना देखील मोठ्याप्रमाणात पसंद पडला असून अनेकांनी त्यावर कमेंट्स केलेल्या आहेत. दिल्ली कॅपिटलने देखील आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरतून श्रेयसचा हा फोटो शेअर केलेला आहे. ट्विटरवर देखील अनेकांना श्रेयसचा हा फोटो आवडला आहे.

https://www.instagram.com/p/CPFH4pXJPtn/

श्रेयस पुण्यात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापासूनच मैदानाबाहेर आहे. एकदिवसीय मालिकेतील उर्वरित सामने तसेच इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या हंगामात देखील तो खेळू शकला नव्हता. श्रेयसच्या चाहत्यांना आशा असेल की तो लवकरात लवकर तंदुरुस्त होवून मैदानात उतरेल. श्रेयसच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाली असून आता तो त्यातून सध्या सावरत आहे. त्याने हळूहळू ट्रेनिंगला देखील सुरुवात केली आहे.

श्रेयसच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरीचा विचार केला असता, त्याने आपल्या कामगिरीत नेहमीच सातत्य राखले आहे. श्रेयसने भारताकडून खेळलेल्या 21 एकदिवसीय सामन्यात 44.03 च्या सरासरीने 807 धावा केलेल्या आहेत. यादरम्यान त्याने 8 अर्धशतक व 1 शतक देखील ठोकलेले आहे. श्रेयसची एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या ही 103 धावा राहिलेली आहे.

तसेच श्रेयसने भारताकडून 29 टी20 सामने खेळलेले असून त्यात 28.9 च्या सरासरीने 550 धावा केलेल्या आहेत. यादरम्यान श्रेयसने 3 अर्धशतके देखील ठोकलेली आहेत. श्रेयस जेव्हा दुखापतग्रस्त झाला तेव्हा तो शानदार कामगिरी करत होता. त्यामुळे सर्व क्रिकेट प्रेमींना आशा असेल की पुन्हा मैदानावर पुनरागमन केल्यानंतरही श्रेयस आपल्या कामगिरीत त्याच प्रकारचे सातत्य राखण्यात यशस्वी होवो.

महत्त्वाच्या बातम्या – 

काय सांगता! अनुष्का शर्मा नाही तर ‘या’ अभिनेत्रीचा विराट कोहली होता मोठा फॅन, स्वत:च दिली कबुली

काय रे देवा! ‘फ्रेंड्स’ सीरिजचा ट्रेलर शेअर केल्यामुळे युझवेंद्र चहल पत्नी धनश्रीकडूनच ट्रोल; पाहा मजेशीर व्हिडिओ

“विराट, धोनी व रोहित प्रमाणेच डिव्हिलियर्सलाही मिळते भारतीय चाहत्यांकडून प्रेम”, पाहा कोण म्हणतंय असं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---