भारत आणि न्यूझीलंडमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (३ डिसेंबर) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर सुरू झाला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव संपून न्यूझीलंडचा देखील पहिला डाव संपला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात भारतीय गोलंदाज आक्रमक भूमिकेत दिसले आणि परिणामी न्यूझीलंड संघ खूपच स्वस्तात सर्वबाद झाला. दरम्यान, न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
न्यूझीलंडच्या एजाज पटलेने भारताच्या १० खेळाडूंचे बळी घेत संघाला सर्वबाद केले. त्यानंतर न्यूझीलंड संघ फलंदाजीसाठी आला, पण त्यांचा खूप लवकर गाशा गुंडाळला. न्यूझीलंड अवघ्या ६२ धावा करून सर्वबाद झाला. यासाठी भारताच्या अक्षर पटेनेही मोलाचे योगदान दिले. अक्षर पटेलने डॅरिल मिशेल आणि काइल जेमिसन या दोन महत्वाच्या विकेट्स घेतत्या. काइल जेमिसन आठव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता आणि सर्वात शेवटी बाद झाला.
जेमिसन डावाच्या २९ व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला. अक्षर पटेलच्या एका फिरकी चेंडूवर जेमिसनने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण हा शॉट खेळताना त्याची बॅट चुकून खेळपट्टीवर घासली.
बॅट खेळपट्टीवर घासल्यामुळे चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरच्या कोपऱ्याला स्पर्श करून यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या हाती गेला. हा चेंडू सहज पकडता आला असता, पण साहाला त्याचा अंदाज घेता आला नाही. त्यामुळे चेंडू त्याच्या हाताच्या वरच्या बाजूला लागला आणि हवेत उडाला. सुदैवाने श्रेयस अय्यर सिली पॉइंटला क्षेत्ररक्षणासाठी उपस्थित होता. चेंडू साहाच्या हातातून हवेत उडताच, श्रेयस अय्यरने झेप घेतली हा झेल पकडला. श्रेयसने दाखवलेल्या या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
— Cricsphere (@Cricsphere) December 4, 2021
दरम्यान, कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एजाज पटेलच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे भारतीय संघ ३२५ धावांवर सर्वबाद झाला आणि न्यूझीलंडला फलंदाजीची संधी मिळाली. त्यानंतर भारताच्या रविचंद्रन अश्विन (४), मोहम्मद सिराज (३), अक्षर पटेल (२) आणि जयंत यादन (१) यांच्या भेदक माऱ्यामुळे न्यूझीलंड संघ (६२) स्वस्तात तंबूत परतला.
महत्त्वाच्या बातम्या –
तुमच्याही लक्षात नसेल; फक्त एजाज पटेल नाही, तर उमेश यादवच्या नावावरही अनोखा रेकॉर्ड नोंदवला गेलाय
साहाची विकेट एजाजसाठी भलतीच खास; १० बळी घेतल्यावरच नव्हे, तर ५ बळी घेताच पठ्ठ्याने केलाय भीमपराक्रम
पटेलच्या ‘परफेक्ट १०’चा थरार अनुभवा एकाच व्हिडिओतून, पाहा एकट्यानेच कशी उडवलीय भारताची दाणादाण