आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाच्या सुरुवातीची तारीख समोर आली आहे. तसेच यावेळी 10 संघांसह जगातील सर्वात मोठी लीग 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचे अध्यक्ष अरुण धुमळ यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली आहे. यावेळी देशात लोकसभा निवडणुकाही होणार आहेत. हे लक्षात घेऊन ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. याबरोबरच IPL 2024 पूर्वी कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर आयपीएल 2024 मधून बाहेर होऊ शकतो. त्यामुळे कोलकात्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असू शकतो. तसेच अय्यरला आयपीएलचा शेवटचा हंगाम देखील खेळता आला नव्हता. त्यामुळे अय्यर यांच्या अनुपस्थितीत नितीश राणाने कोलकाताचे नेतृत्व केले होते.
याबरोबरच श्रेयस अय्यर भारतीय संघातून विश्रांती घेतल्यानंतर रणजी ट्रॉफी खेळत आहे. या दरम्यान अय्यरला पाठीला दुखापत झाली आहे. ही दुखापत जास्त आहे. त्यामुळे श्रेयस अय्यर रणजी ट्रॉफी 2023-24 च्या उपांत्यपूर्व फेरीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे तो केवळ रणजीच नाही तर आयपीएल 2024 मधूनही बाहेर जाऊ शकतो. त्यामुले कोलकात्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का असणार आहे.
He will comeback stronger ❤️🇮🇳#ShreyasIyer #AmiKKR pic.twitter.com/GNn0DA8fJe
— kkr4ever (@_kkr4ever_) February 20, 2024
तसेच श्रेयस अय्यर सध्या खराब फॉर्ममध्ये असून सुद्धा अय्यरला बराच काळ भारतीय संघाचा भाग बनवण्यात आले, पण तो आपल्या कामगिरीने कर्णधाराला प्रभावित करू शकला नाही. अय्यरने 13 कसोटी डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावले नाही. कदाचित याच कारणामुळे त्याला इंग्लंडविरुद्ध 2 कसोटी सामने खेळल्यानंतर विश्रांती देण्यात आली होती.
Injuries to Shreyas Iyer (back spasms) and Shivam Dube (side strain) have ruled them out of Mumbai's knockout #RanjiTrophy match
Full story 👉 https://t.co/1CvlY1HVSB pic.twitter.com/6wbS423CsB
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 20, 2024
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात असून भारताने या मालिकेतील पहिल्या 3 सामन्यात इंग्लंडचा 2-1 ने पराभव करत आघाडी घेतली आहे. तर आता भारताला मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळायचा आहे. याबरोबरच दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. भारताने हा सामना जिंकला तर टीम इंडिया मालिकेवर कब्जा करेल. दुसरीकडे, इंग्लंड हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
महत्वाच्या बातम्या –
- IPL 2024आधी आंद्रे रसेलचे तुफान! बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये ठोकल्या 12 चेंडूत नाबाद 43 धावा
- विराट कोहली दुसऱ्यांदा झाला बाप, ‘अकाय’ नावाचा अर्थ काय? घ्या जाणून सविस्तर