---Advertisement---

हैदराबादचा हिरो ठरला गिल! द्विशतकी खेळीने दिड महिन्यात केला ईशानचा विक्रम उद्ध्वस्त

---Advertisement---

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी (दि. 18 जानेवारी) हैदराबाद येथे खेळण्यात आला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघासाठी सलामीला आलेल्या युवा शुबमन गिल याने आपला लाजवाब फॉर्म कायम राखला. या सामन्यात एक मोठा पराक्रम करत त्याने द्विशतक साजरे केले. वनडे क्रिकेटमध्ये 200 धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. या द्विशतकी खेळीत त्याने अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली.

 

यावर्षी भारतातच होत असलेल्या वनडे विश्वचषकासाठी सलामीचा दावेदार म्हणून गिल प्रयत्न करत आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत एक शतक व एक अर्धशतक ठोकलेल्या गिलने या सामन्यात एकहाती संघाची धुरा वाहिली. त्याने 145 चेंडूंवर द्विशतक पूर्ण केले. बाद होण्यापूर्वी त्याने 19 चौकार व 9 षटकारांच्या मदतीने 149 चेंडूंवर 208 धावांची खेळी केली.

गिल या द्विशतकासह आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वात कमी वयात द्विशतक पूर्ण करणारा फलंदाज ठरला. त्याने अवघ्या 23 वर्ष 132 दिवस इतक्या वयात ही कामगिरी केली. त्याच्या आधी हा विक्रम ईशान किशन याच्या नावे होता. त्याने मागील महिन्यातच बांगलादेशविरुद्ध 24 वर्ष 145 दिवसात ही कामगिरी करून दाखवली होती. तर, 2013 मध्ये रोहित शर्मा आपले पहिले द्विशतक साजरे करताना 26 वर्ष 186 दिवसांचा होता.

सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय वनडेत दुहेरी शतक झळकावण्याची कामगिरी सचिन तेंडुलकर याने 2010 मध्ये केलेली. त्यानंतर वीरेंद्र सेहवाग याने पुढच्याच वर्षी ही कामगिरी केली. सध्या भारतीय संघाचा कर्णधार असलेला रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक तीन वेळा द्विशतक झळकावण्यात यशस्वी ठरला आहे. त्यानंतर आता ईशान किशन व शुबमन गिल या युवा फलंदाजांनी देखील ती कामगिरी करून दाखवली. विदेशी क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानचा फखर झमान, न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल व वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांना हा मान मिळाला आहे.

(Shubham Gill Become Youngest Double Centurion In ODI History)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलने मैदान मारलं! शुबमनचे न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी द्विशतक, गोलंदाजांची मोडली कंबर 
तूच रे पठ्ठ्या! गिलने शतक ठोकताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, विराट अन् धवनलाही टाकले मागे

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---