क्रिकेटपटू त्यांच्या उत्तम खेळीसाठी जसे चर्चेत असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या नवनवीन लूक्समुळे देखील चर्चेत येत असतात. चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना सोशल मीडियावर फॉलो करत असतात. त्याच्या नवनवीन पोस्टला लाइक्स आणि कमेंट करत असतात. नुकतेच आता स्टार सलामीवीर शुभमन गिलने आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी आपला लूक बदलला आहे.
भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध साऊथॅम्प्टन येथे खेळला होता आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी तो कसोटी संघाचा देखील भाग होता. पण, इंग्लंडविरुद्धची मालिका सुरु होण्यापूर्वी त्याला दुखापत झाल्याने मायदेशी परतावे लागले.
गिलने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दोन्ही डावांमध्ये 28 आणि 8 धावांचे योगदान दिले. यानंतर, गिलच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर गेला. शुभमन जुलैमध्येच भारतात परतला होता.
भारतात परतल्यानंतर स्टार सलामीवीर शुभमनने आपला लूक पूर्णपणे बदलला आहे. त्यामुळे तो त्याच्या लूकबद्दल बराच चर्चेत आहे. शुभमनने स्वत: चा एक व्हिडिओ सोशल मीडियावर नवीन हेअरस्टाईलसह पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते की, गिलने आपले केस खूप लहान कापले आहेत आणि त्याला एक नवीन रंग देखील दिला आहे. गिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शुभमनने नव्या लूकमध्ये शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. काही चाहत्यांना त्याची ही नवीन हेअरस्टाईल प्रचंड आवडली आहे. तर अनेकांनी त्याला त्याच्या नवीन हेअरस्टाईलमुळे ट्रोल देखील केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याच्या या नवीन लूकची चर्चा प्रचंड होत आहे.
https://www.instagram.com/p/CSZBGQdp1rG/
शुभमन सप्टेंबरमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसू शकतो. शुभमन आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) फ्रँचायझी संघाचा भाग आहे. शुभमनने भारतासाठी आतापर्यंत आठ कसोटी आणि तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत. आठ कसोटी सामन्यांमध्ये शुभमनने 31.84 च्या सरासरीने 414 धावा केल्या आहेत. यादरम्यान, गिलच्या खात्यात तीन अर्धशतके नोंदवली गेली आहेत. शुभमनची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 91 धावा आहे.
तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये गिलने 16.33 च्या सरासरीने 49 धावा केल्या आहेत. गिलला आतापर्यंत मर्यादित षटकांच्या स्वरूपात भारतासाठी खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही. मात्र, तो आता मागील काही काळापासून कसोटी संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे आणि रोहित शर्मासह सलामीवीराची भूमिका बजावत असतो.
महत्त्वाच्या बातम्या –
‘धोनीचं नाव नाही घेतलं, तर भारतात मला मारतील’, जेमिमाहच्या अजब उत्तराने वेधले लक्ष
लॉर्ड्स ठरणार विराटसाठी प्रेरणादायी; लवकरच झळकावणार शतक, दिग्गज इंग्लिश कर्णधाराची भविष्यवाणी