---Advertisement---

‘कोहलीला भेटण्यासाठी रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये झाला सहभागी’, शुबमन गिलचे ट्वीट तुफान व्हायरल

Virat-Kohli-and-Christiano-Ronald
---Advertisement---

भारतीय संघ सध्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. आतापर्यंत या मालिकेतील ४ कसोटी सामने झाले आहे, तर ५ वा कसोटी सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होणार होता. मात्र, हा सामना सध्यातरी रद्द करण्यात आला आहे. मात्र या सामन्यापूर्वी आता एक मजेदार किस्सा घडला आहे.

यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मॅंचेस्टर युनायटेड या फुटबॉल संघाचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो दोघेही मॅंचेस्टर शहरात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर याबाबत एक वेगळीच चर्चा चालू आहे. रोनाल्डो आणि कोहली हे दोघेही आपापल्या खेळातील एक महान खेळाडू आहे. अशात हे दोघेही एकाच शहरात आल्यामुळे चाहत्यांनी या घटनेला चांगलेच उचलून धरले आहे. यात भारतीय संघाचा युवा फलंदाज शुभमन गिलने देखील याबाबत सोशल मीडियावर आपले मजेशीर मत मांडले.

शुभमन गिलने एक ट्विट करत लिहिले की, “अधोरेखित मत- भारतीय कर्णधार विराट कोहलीला भेटण्यासाठी क्रिस्तियानो रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये सहभागी झाला होता.” आता गिलचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. चाहते देखील याची चांगलीच मजा घेत आहेत.

तसेच या आधीही इंग्लंडमधील काउंटी क्रिकेट क्लब लंकाशायरने एक ट्विट केले होते. ज्यात त्यांनी लिहिले की, “यावेळी विराट कोहली आणि क्रिस्तियानो रोनाल्डो मॅंचेस्टरमध्ये आहेत.” ज्यानंतर क्रिस्तियानो रोनाल्डोचा क्लब मॅंचेस्टर युनायटेडने देखील यावर प्रतिक्रिया नोंदवत लिहिले की, “एकाच शहरात २ महान (G.O.A.T) खेळाडू उपस्थित आहेत.”

दरम्यान इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ वा कसोटी सामना मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात शुक्रवारपासून (१० सप्टेंबर) खेळविण्यात येणार होता. मात्र, या आधीच भारतीय संघाचे सहयोगी फिजिओ योगेश परमार यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तरी, अजून मालिकेचा निकाल मात्र, प्रलंबित आहे. या रद्द झालेल्या सामन्याबद्दल काय करायचे याबद्दल येत्या काही दिवसात इंग्लंड क्रिकेट मंडळ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात बैठक होईल. सध्या ४ सामन्यांनंतर भारतीय संघ २-१ अशा फरकाने मालिकेत आघाडीवर आहे.

यापूर्वीच भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि मुख्य फिजियो यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. यानंतर आणखी एका सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण झाल्यामुळे खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे हा सामना रद्द करण्याचा विचार चालू होता.

महत्त्वाच्या बातम्या –
आर अश्विनने ४ वर्षांनी टी२० संघात पुनरागमन करण्यासाठी महत्त्वाची ठरलेली ३ कारणे
मुछे हो तो नत्थूलाल जैसी अन् क्रिकेटर असावा तर लालाजींसारखा
भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग ९ – तिसरा गोलंदाज

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---