भारत आणि वेस्ट इंडिज मध्ये नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत भारताने विंडीजला क्लीन स्विप दिला. या वेळी तिसरा सामना गाजवला विशेषत: सलामीवीर शुभमन गिल याने. गिल तिसऱ्या सामन्यात ९८ धावा करत नाबाद राहिला. यावेळी पावसामुळे सामन्यातील षटके कमी केल्याने त्याला त्याचे पहिले शतक झळकावता आले नाही. मात्र, त्याने ९८ धावा करत अनेक विक्रम आपल्या नावावर नोदवले.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs WI), तो शुभमन गिलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी खेळण्यात यशस्वी झाला. पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात त्याने ९८ धावांची नाबाद खेळी खेळली. यापूर्वी त्याने टीम इंडियासाठी ११ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले असून ९१ धावा ही सर्वोच्च धावसंख्या होती. चालू मालिकेत तो दुसऱ्यांदा ५० पेक्षा जास्त धावा करण्यात यशस्वी झाला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ६४ धावा केल्या. याशिवाय दुसऱ्या सामन्यात त्याने ४३ धावांची इनिंग खेळली. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ मालिकेत २-० ने आघाडीवर आहे.
शुभमन गिलची सर्वोच्च खेळी
टेस्ट – ९१
आयपीएल – ९६
एकदिवसीय – ९८*
शुभमन गिलने 98 चेंडूंच्या खेळीत ७ चौकार आणि २ षटकार मारले. त्याला पहिले एकदिवसीय शतक झळकावण्याची सोपी संधी होती पण पावसामुळे ते पूर्ण होऊ शकले नाही. पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे भारताच्या डावात दोनदा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. पावसामुळे दुसऱ्यांदा खेळ थांबवण्यात आला तेव्हा गिल ९८ धावांवर नाबाद होता. भारतीय संघाने ३६ षटकांत ३ गडी गमावून २२५ धावा केल्या होत्या. पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर डकवर्थ लुईसच्या नियमानुसार वेस्ट इंडिजला ३५ षटकांत २५७ धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाला पुन्हा फलंदाजीची संधी मिळाली नाही.
तत्पूर्वी, शुभमन गिलने कर्णधार शिखर धवनसह पहिल्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली होती. धवन ७४ चेंडूत ५८ धावा काढून बाद झाला. त्यानंतर शुभमनने भारतीय फलंदाजीची धुरा सांघाळली. अन् त्याला इतर फलंदाजांनी चांगली साथ दिली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
शुभमनचं शतक हुकलं! पण पठ्ठ्यानं थेटं केली सचिन अन् सेहवागची बरोबरी, पाहा काय आहे विक्रम
सामना जिंकूनही शुभमन गिलच्या मनात राहिली ‘ही’ खदखद! नंतर म्हणाला, ‘सामन्यात आणखी…’
CWG 2022: पीव्ही सिंधू सलग दुसऱ्यांदा ध्वजवाहक, ओपनिंग सेरेमनीत भारतीय दलाचे करणार नेतृत्त्व