भारतीय संघाने वेस्ट इंडीज दौऱ्याची सुरुवात गोड केली आहे. उभय संघातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी (२२ जुलै) त्रिनिदादमध्ये खेळला गेला. भारतीय संघाने ३ धावांनी हा सामना जिंकला आणि मालिकेत ०-१ अशी आघाडी घेतली. युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि अनुभवी शिखर धवनने चांगली सुरुवात दिल्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला. दरम्यान, शुबमन गिलीने स्वतःच्या नावापुढे वेस्ट इंडीजच्या धरतीवर एका खास विक्रमाची नोंद केली आहे.
वेस्ट इंडीज संघाने सामन्याच्या सुरुवातील नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. परंतु शिखर धवन आणि शुबमन गिल (Shubman Gill) यांनी वेस्ट इंडीज संघाचा हा निर्णय साफ चुकीचा ठरवला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकीय भागीदारी पार पाडली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. शिखर धवनने ९९ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ९७ धावा केल्या. तसेच गिलने ५३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६४ धावा केल्या.
शुबमन गिलीने या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा खास विक्रम मोडीत काढला आहे. गिल आता वेस्ट इंडीजमध्ये खेळलेल्या एकदिवसीय सामन्यात सर्वता कमी वयात भारतासाठी अर्धशतक ठोकणारा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. गिलने ही कामगिरी २२ वर्ष आणि ३१७ दिवसांचा असताना केली आहे. यापूर्वी सचिन २४ वर्ष आणि ३ दिवसांचा असताना वेस्ट इंडीजमधील एका एकदिवसीय सामन्यात अर्धशतक केले होते. मात्र, गिलने शुक्रवारी केलेल्या प्रदर्शनानंतर सचिन आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
वेस्ट इंडीजमध्ये एखदिवसीय सामन्यात अर्धशतक करणारे सर्वात कमी वयाचे भारतीय सलामीवीर
२२ वर्ष ३१७ दिवस – शुबमन गिल
२४ वर्ष ००३ दिवस – सचिन तेंडुलकर
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर प्रथम फलंदाजी करताना धवन आणि गिलने केलेल्या ११९ धावांच्या भागीदारीनंतर भारताने ३०८ धावा उभा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ ५० षटकांमध्ये ६ विकेट्सच्या नुकसानावर ३०५ धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
WIvIND: काट्याच्या लढतीत टीम इंडियाचा विजयाने श्रीगणेशा; वेस्ट इंडिज अवघ्या ३ धावांनी पराभूत
तुफानी अर्धशतकासह श्रेयस दिग्गजांच्या पंक्तीत; फोडून काढली कॅरेबियन गोलंदाजी
धवन-गिलची झक्कास कामगिरी! दोघांनीही मागे सोडला ‘विक्रमादित्य सचिन’