झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने तिसऱ्या व अखेरच्या सामन्यातही शानदार फलंदाजी करत ८ बाद २८९ अशी मोठी धावसंख्या रचली. युवा फलंदाज शुबमन गिल याने या सामन्यात भारतीय फलंदाजीचे नेतृत्व केले. त्याने शानदार फलंदाजी करत आपल्या कारकिर्दीतील पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. आपल्या आक्रमक शतकी खेळी दरम्यान त्याने काही विक्रमांना गवसणी घातली.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधर केएल राहुल व शिखर धवन बाद झाल्यानंतर, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या गिलने आयपीएलपासून सुरू असलेला आपला अप्रतिम फॉर्म कायम राखला. आधी त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले. त्याने ईशान किशनसोबत १४० धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने वेगाने शतकाकडे कूच केली. ८२ चेंडूत त्याने शतक पूर्ण केले. भारतीय डावाच्या अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी त्याने ९७ चेंडूवर १५ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १३० धावा केल्या.
आपल्या १३० धावांच्या खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रम आपल्या नावे जमा केले. तो झिम्बाब्वेत शतक झळकावणारा सर्वात युवा भारतीय बनला. तसेच, झिम्बाब्वेमध्ये भारतीयाच्या वतीने सर्वोच्च वैयक्तिक वनडे खेळीचा विक्रम देखील त्याने आपल्या नावे केला. यापूर्वी सचिन तेंडुलकरने १९९८ मध्ये बुलावायो वनडेत १२७ धावांची खेळी केली होती. विशेष म्हणजे त्यावेळी शुबमन गिलचा जन्मही झाला नव्हता.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी अंबाती रायूडू आहे. त्याने २०१५ मध्ये १२४ धावांची खेळी केली होती. तर सचिन तेंडुलकरने २००१ मध्ये १२२ व युवराज सिंगने २००५ मध्ये १२० धावांची खेळी हरारेच्या मैदानात केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याला माझी गरज…’ अनेक वर्ष एकत्र खेळलेल्या डिव्हिलियर्सने विराटला दिला प्रेमाचा सल्ला
अस्पायर एफसीचा सलग दुसरा विजय; नवी मुंबईच्या एफएसआयविरुद्ध नोंदवले सात गोल
‘सोन्याच्या बदल्यात पितळ!’ आफ्रिदीची जागा घेणाऱ्या हसनैनची आकडेवारी पाहून तुम्हीही हेच म्हणाल