आशिया चषक 2023 स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेला भारतीय संघाच्या पहिल्या चार फलंदाजांनी अत्यंत निराश केले. भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, हा निर्णय पाकिस्तानी गोलंदाजांनी साफ चुकीचा ठरवला. कर्णधार रोहितनंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यापाठोपाठ शुबमन गिल हादेखील स्वस्तात तंबूत परतला. गिलची मागील अठरा वनडे सामन्यातील कामगिरी पाहिल्यास तो फॉर्ममध्ये नसल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानविरुद्ध पहिलाच सामना खेळत असलेल्या गिलचा पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांपुढे टिकाव लागला नाही. शुबमन या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत सलामीला उतरला होता. मात्र, त्याने सुरुवातीपासूनच संथ गतीने फलंदाजी केली. त्याला आपले खाते खोलण्यासाठी 12 चेंडू वाट पाहावी लागली. या सामन्यात त्याने एकूण 32 चेंडूंचा सामना केला. मात्र, तो 10 धावांवर बाद झाला.
नवीन वर्षाच्या सुरुवातीला गिल हा जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. त्याने न्यूझीलंडविरुद्ध शानदार द्विशतक झळकावले होते. मात्र, त्यानंतर तो पूर्णतः अपयशी ठरल्याचे दिसतो. मागील 18 सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून वनडेत केवळ दोन अर्धशतके आली असून, त्यानंतर याची सर्वात मोठी धावसंख्या 34 आहे.
गिल हा आगामी वनडे विश्वचषकात खेळताना देखील दिसू शकतो. मात्र, केएल राहुल याने संघात पुनरागमन केल्यास सलामीच्या जागेसाठी त्याला ईशान किशन याच्याशी स्पर्धा करावी लागू शकते. तसेच अनुभवी शिखर धवन याच्या नावाची देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. आशिया चषकातील उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्याचा दबाव आता गिल याच्यावर असेल.
(Shubman Gill Hits Only 2 Half Century In ODI In Last 18 Matches Departed On 10 Against Pakistan)
महत्वाच्या बातम्या –
वनडे आशिया चषकात 2014 पासून विराटची बॅट शांतच, समोर आले चाहत्यांची चिंता वाढवणारे आकडे
भारताचा सलग तिसरा फलंदाज स्वस्तात बाद! हॅरिस रौफने केली श्रेयस अय्यरची शिकार