---Advertisement---

‘ती’ घटना घडली अन् बाऊंसरची भीती पळाली, शुबमन गिलने केला खुलासा

On: सोमवार, जानेवारी 25, 2021 2:38 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ मागील आठवड्यात यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतला आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेत भारतीय संघाने २-१ अशा फरकाने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयात भारताच्या युवा क्रिकेटपटूंनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. यात शुबमन गिलचाही समावेश आहे. गिलने या मालिकेत सलामीला फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क आणि जॉश हेजलवूड अशा वेगवान गोलंदाजांच्या बाऊंसरचाही धैर्याने सामना केला. असे असले तरी एक वेळ अशी होती जेव्हा तो बाऊंसर चेंडू खेळायला घाबरायचा.

याबाबत खुद्द गिलनेच खुलासा केला आहे. कोलकाता नाईट रायडर्सला दिलेल्या मुलाखतीत गिलने सांगितले की तो लहानपणी बाऊंसर चेंडूंना घाबरायचा. पण नंतर शालेय क्रिकेटदरम्यान अशी घडना घडली की त्याची भीती पूर्णपणे नाहीशी झाली.

गिल म्हणाला, ‘मी जेव्हा लहान होतो, तेव्हा मी बाऊंसर चेंडूंना घाबरायचो. मी पहिले छातीपर्यंत येणाऱ्या चेंडूंसाठी तयार असायचो. मी ड्राइव्ह मारण्याचाही खुप सराव करायचो. त्यामुळे मला सरळ बॅटने पुल शॉट चांगला खेळता येतो. तसेच मी एक शॉट तयार केला, जो मी थोडा मागे जाऊन कट खेळतो. पण मी आखुड टप्प्याच्या चेंडूंना घाबरायचो, त्यामुळे मी नेहमी चेंडूच्या लाईनपासून बाजूला जाऊन कट शॉट खेळायचो. त्यामुळे लहानपणी ते दोन शॉन मला आवडायचे.’

पुढे गिल म्हणाला, ‘जेव्हा तुम्हाला चेंडू लागतो, तेव्हा तुमची सगळी भीती नाहिशी होते. तुम्हाला भीती तेव्हाच वाटते जोपर्यंत तुम्हाला चेंडू लागलेला नसतो. त्यानंतर तुम्हाला ते सर्व सवयीचे होऊन जाते. मी जेव्हा ९ वर्षांचा होतो, तेव्हा मला माझ्यापेक्षा जास्त वयाच्या मुलांसह खेळण्यास सांगितले होते. अकादमीमध्ये एक वेगवान गोलंदाज होता. मी त्याच्याविरुद्ध फलंदाजी करत होतो आणि मला वाटत होते की त्यावेळी मला बाऊंसर त्याने टाकू नये असे वाटत होते. त्यामुळे मी आधीच विचार करत होतो की मी बचावात्मक खेळेल.’

२१ वर्षीय गिल म्हणाला, ‘त्यावेळी त्या गोलंदाजाने बाऊंसर टाकण्याचा प्रयत्न केलाच, पण चेंडू थोडा वर होता. मला हे कळाले होते, पण मी थोडा खाली झुकलो आणि चेंडूला बॅटची कड घेऊन बाऊंड्री जवळ जाताना पाहिले. त्यावेळी मला समजून चुकले की तो खुप वेगवान नाही. त्यावेळी मी २-३ बाऊंड्री आणखी मारल्या. माझा आत्मविश्वास वाढला. या घटनेनंतर माझ्या मनातील बाऊंसरची भीती कायमची गेली.’

गिलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रभावी कामगिरी –

गिलने सर्वांना ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रभावित केले. त्याला मेलबर्न कसोटीत पदार्पणाची संधी मिळाली. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने ४५ आणि नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर त्याने २ अर्धशतकेही झळकावली. यात ब्रिस्बेन येथे केलेल्या महत्त्वपूर्ण ९१ धावांच्या खेळीचाही समावेश आहे. तसेच तो या कसोटी मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा चौथ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज होता. त्याने ६ डावात मिळून ५१.८० सरासरीने २५९ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

पंत आणि साहामध्ये यष्टीरक्षणासाठी टक्कर? वृद्धिमान साहा म्हणतो, “शेवटचा निर्णय संघ…”

कुमार संगकारा राजस्थान रॉयल्स संघात सहभागी, पण खेळाडू म्हणून नाही तर…

आऊट, आऊट..! अप्रतिम झेल पकडल्यानंतर पठ्ठ्यानं ‘असा’ साजरा केला आनंद, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---