इंडियन प्रीमियर लीग 2023 चा दुसरा क्वॉलिफायर सामना शुक्रवारी (26 मे) मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला गेला. गुजरातचा सलामीवीर शुबमन गिलने या सामन्यात पुन्हा एकदा आपला शानदार खेळ दाखवला. त्याने मुंबईची गोलंदाजी फोडून काढत 129 धावांची दमदार खेळी केली. या शतकी खेळीबरोबरच त्याने आयपीएल इतिहासात प्ले ऑफमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या बनवण्याचा विक्रम देखील केला.
चेन्नईविरुद्ध पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झाल्यानंतर गुजरातला या सामन्यात विजय आवश्यक होता. संघाच्या विजयाची जबाबदारी शुबमन गिलने आपल्या खांद्यावर घेतली. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करताना मुंबईच्या गोलंदाजांना निष्प्रभ केले. अवघ्या 22 चेंडूंमध्ये त्याने या हंगामातील आपले पाचवे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर शतक पूर्ण करण्यासाठी त्याला अवघे 17 चेंडू लागले. बाद होण्यापूर्वी त्याने केवळ 60 चेंडूंमध्ये 129 धावा केल्या. यामध्ये 7 चौकार व 10 षटकारांचा समावेश होता. या खेळीसह त्याने या हंगामात ऑरेंज कॅप देखील आपल्या नावे केली.
या खेळी सोबतच तो आयपीएल इतिहासात प्ले ऑफमध्ये सर्वोच्च धावसंख्या बनवणारा फलंदाज बनला. यापूर्वी ही कामगिरी पंजाबसाठी वीरेंद्र सेहवाग याने केली होती. त्याने 2014 च्या क्वालिफायर 1 मध्ये चेन्नईविरुद्ध 122 धावांची खेळी केली होती. तर, 2019 आयपीएलच्या अंतिम सामन्यात शेन वॉटसनने 117 धावांची नाबाद खेळी केली होती. तर, वृद्धिमान साहाने 2014 आयपीएलच्या अंतिम सामन्यात पंजाबसाठी 115 धावा फटकावलेल्या.
या सामन्याचा विचार केल्यास गिलच्या शतकानंतर साई सुदर्शन व कर्णधार हार्दिक पंड्या यांनी देखील महत्त्वाचे योगदान दिले. त्यांच्या योगदानामुळे गुजरात संघ 233 पर्यंत मजल मारू शकला.
(Shubman Gill Register Highest Individual Scrore In IPL Play Offs History)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल क्लोजिंग सेरेमनी । रॅपर किंग-डिवाइनसह हे मोठे कलाकार लावणार हजेरी
ब्रेकिंग! मुंबई विरुद्ध गुजरात सामना रद्द? गुजरात थेट फायनलमध्ये पोहोचणार, वाचा धक्कादायक माहिती