---Advertisement---

रोहित शर्मासोबत मतभेद?…म्हणून शुबमन गिलला टीम मॅनेजमेंटनं परत पाठवलं, मिळाली मोठ्या चुकीची शिक्षा

On: शनिवार, जून 15, 2024 10:21 AM
shubman gill
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 साठी सलामीवीर शुबमन गिलचा राखीव खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. तो भारतीय संघासोबत अमेरिकेलाही गेला होता. मात्र, न्यूयॉर्कमधील सामने संपल्यानंतर टीम मॅनेजमेंटनं त्याला भारतात परत पाठवलं. आता याबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

वृत्तानुसार, शुबमन गिलला अनुशासनहीनतेमुळे भारतात परत पाठवण्यात आलंय. तो टीम इंडियासोबत अमेरिकेला गेला होता, मात्र तेथे तो त्याच्या साईड बिझनेसच्या नियोजनातच व्यस्त होता. त्याला टीमसोबत राहण्यात काही रस दिसत नव्हता. यामुळे त्याला भारतात परत पाठवण्यात आलं आहे.

2024 च्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा झाली तेव्हा शुबमन गिल, रिंकू सिंह, आवेश खान आणि खलील अहमद यांचा संघात राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. मात्र, न्यूयॉर्कमधील सामने संपल्यानंतर गिल आणि आवेश खानला भारतात परत पाठवण्यात आलं, तर खलील अहमद आणि रिंकू सिंह यांना संघासोबत कायम ठेवण्यात आलं आहे.

आता शुबमन गिलला भारतात परत पाठवण्यामागचं एक मोठं कारण समोर आलं आहे. ‘क्रिकेट वन’च्या वृत्तानुसार, गिलवर अनुशासनहीनतेमुळे ही कारवाई करण्यात आली. तो जेव्हापासून अमेरिकेला गेला, तेव्हापासून तो भारतीय संघासोबत फिरलेला नाही. तो आपला जास्तीत जास्त वेळ साईड बिझनेसचं नियोजन करण्यातच घालवत होता. तसेच भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान खलील अहमद, आवेश खान आणि रिंकू सिंह हे टीमला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये गेले होते, मात्र शुबमन गिल तेथे दिसला नव्हता.

याशिवाय आणखी एक बातमी समोर येत आहे की, शुबमन गिलनं भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला इंस्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे. तसेच रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्यात सर्व काही सुरळीत नसल्याचा अंदाजही बांधला जातोय.

महत्त्वाच्या बातम्या – 

नेपाळचा हार्टब्रेक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या एका धावेनं पराभव
टी20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला दुहेरी झटका, 2026 च्या स्पर्धेत थेट एंट्री मिळणार नाही!
टी20 विश्वचषकातून बाद होताच सौरभ नेत्रावळकरनं उडवली पाकिस्तानची खिल्ली, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---