इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. यानंतर या स्पर्धेचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. सप्टेंबर महिन्यात युएईमध्ये या स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघाला मोठा धक्का बसला आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याची बातमी समोर आली होती. ही बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण आगामी इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याला सलामी फलंदाजी करण्याची संधी मिळणार होती. परंतु त्याची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला कमीत कमी ३ महिने मैदानापासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे तो इंग्लंड दौऱ्यातून बाहेर झाला आहे.
तसेच त्याला आयपीएल स्पर्धेतून देखील बाहेर व्हावे लागणार आहे. आयपीएल २०२१ सुरू होण्यापूर्वी हा कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी दुसरा मोठा धक्का आहे. कारण कर्णधार ओएन मॉर्गन देखील दुसऱ्या टप्प्यात सहभाग घेणार नाही. (Shubman gill set to ruled out from ipl 2021 due to injury)
इनसाईड स्पोर्टसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, गिल ३ महिने मैदानापासून दूर राहणार आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याला फ्रॅक्चर आहे. तो बाहेर गेल्यानंतर केएल राहुल किंवा मयंक अगरवाल या दोघांपैकी एकाला इंग्लंडविरुद्ध सलामी फलंदाजी करण्याची संधी मिळू शकते. तसेच बीसीसीआय श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पृथ्वी शॉला देखील इंग्लंडला बोलवू शकते.
शुबमन गिलची निराशाजनक कामगिरी
शुबमन गिलने दुखापतग्रस्त होण्यापूर्वी निराशाजनक कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध पदार्पण केलेल्या मालिकेत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु त्यानंतर त्याला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. गिलने इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १९.८३ च्या सरासरीने केवळ ११९ धावा केल्या होत्या. तसेच विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने दोन्ही डावात मिळून अवघ्या ३६ धावा केल्या होत्या.
इतकेच नव्हे, आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गिलने ७ सामन्यात १३२ धावा केल्या होत्या. या निराशाजनक कामगिरीनंतर तो संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे त्याला संघात पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Blog: हॅप्पी बर्थडे धोनी- रांची का छोकरा ते कॅप्टनकूल माही
टी२० विश्वचषकापुर्वी अफगानिस्तान संघात मोठा बदल, अव्वल फिरकीपटू राशिद बनला ‘नवा कर्णधार’
एमएस धोनीचे कर्णधार म्हणून घेतलेले खतरनाक ३ निर्णय, ज्यांनी सामना एकहाती फिरवला