---Advertisement---

तिसऱ्या वनडेत ‘या’ तिघांच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष, वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याचा असेल प्रयत्न

On: मंगळवार, जुलै 26, 2022 11:51 AM
Team India
---Advertisement---

वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचा सामना २७ जुलै रोजी खेळला जाणार आहे. पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. भारतीय संघ या मालिकेत २-० ने आघाडीवर आहे. अशात जर हा तिसरा सामना संघाने जिंकला, तर वेस्ट इंडीजला क्लीन स्पीव देता येईल. या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघातील तीन खेळाडूंचे प्रदर्शन पाहण्यासारखे असेल. 

१. शुबमन गिल –
उभय संघातील या एकदिवसीय मालिकेत युवा फलंदाज शुबमन गिल (Shubman Gill) भारताच्या डावाची सुरुवात करताना दिसला आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने संघाला चांगली सुरुवात दिली, त्याच पद्धतीने तिसऱ्या सामन्यातही त्याच्याकडून अपेक्षा असेल. गिलने मालिकेतील पहिल्या सामन्यात ५३ चेंडूत ६४ धावांची खेळी केली होती. यामध्ये ६ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ४९ चेंडूत ४३ धावांची खेळी निघाली.

२. श्रेयस अय्यर – 
एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) साठीही खास ठरणार आहे. त्याने या मालिकेत खराब फॉर्म मागे सोडला असून पहिल्या दोन्ही सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. या दोन्ही सामन्यात त्याने अर्धशतक ठोकले आहे. अशात आगामी सामन्यात सलग तिसरे अर्धशतक ठोकण्याची त्याच्याकडे संधी असेल. पहिल्या सामन्यात त्याने ५७ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तसेच दुसऱ्या सामन्यात ७१ चेंडूत ६३ धावांचे योगदान दिले होते. तिसऱ्या सामन्यात जर तो अशाच प्रकारे प्रदर्शन करू शकला, तर पुन्हा एकदा भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू ठरेल.

३. शार्दुल ठाकुर – 
वेस्ट इंडीजविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) भारतासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज ठरला आहे. उभय संघातील शेवटच्या सामन्यात देखील शार्दुल भारतीय संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडू शकतो. शार्दुल ठाकुर या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघाला मिळालेल्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडू शकला होता. पहिल्या सामन्यात त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या सामन्यात टाकलेल्या ७ षटकांमध्ये ५४ धावा खर्च करून ३ विकेट्स नावावर केल्या होत्या. या सामन्यात शार्दुलव्यतिरिक्त कोणताही गोलंदाज दोन पेक्षा जास्त विकेट्स घेऊ शकला नव्हता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

फक्त तीन टी-२० सामन्यांमध्ये संधी दिल्यानंतर उमरान मलिकचा पत्ता कट, आता ‘असा’ आहे पुढचा प्लॅन

कॉमनवेल्थ गेम्स २०२२साठी भारताचा संघ बर्मिंघममध्ये दाखल, पाहा संपूर्ण स्केड्यूल एका क्लिकवर

शॉकिंग! मुंबईत प्रसिद्ध कबड्डीपटूची डोक्यात स्टंप घालून हत्या, २ तास जागेवरच होता पडून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---