---Advertisement---

सोन्याहून पिवळं! भारताच्या जेतेपदानंतर आता शुबमन गिलला ICCकडून विशेष पुरस्कार

---Advertisement---

आयसीसी पुरुष खेळाडू ऑफ द मंथ विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. (Shubman Gill) भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिलला फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. शुबमन गिल ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स यांच्याशी स्पर्धा करत होता आणि त्यांना मागे टाकत गिलने फेब्रुवारी महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला आहे. (ICC player of the month)

फेब्रुवारी महिन्यात शुबमन गिलची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याने पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये 101.50 च्या प्रभावी सरासरीने 406 धावा केल्या. या दरम्यान गिलचा स्ट्राईक रेट 94.19 होता. शुबमन गिलच्या दमदार कामगिरीमुळेच भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा पराभव केला. नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात गिलने पहिल्यांदा 87 धावांची शानदार खेळी केली. यानंतर, त्याने कटकच्या एकदिवसीय सामन्यात 60 धावा केल्या आणि त्यानंतर अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात त्याने 102 चेंडूत 14 चौकार आणि य षटकारांसह 112 धावांची खेळी केली. याच कारणास्तव, शुबमन गिलला फेब्रुवारी महिन्याचा प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देण्यात आला आहे. (Shubman Gill Performance In February Month)

यानंतर शुभमन गिलने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय संघासाठी शानदार कामगिरी केली. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात त्याने शानदार शतक झळकावून आपल्या संघाला विजयाकडे नेले. यानंतर, त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही 46 धावांची खेळी खेळली.

भारतीय संघाने नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आणखी एक आयसीसी विजेतेपद जिंकले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने शानदार कामगिरी केली. टीम इंडियाने सलग पाच सामने जिंकून जेतेपदावर कब्जा केला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---