काल (२१ जानेवारी) अलिबाग येथे ६६ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र पुरुष संघाची घोषणा करण्यात आली. १३ जानेवारी पासून सुरू असलेल्या महाराष्ट्र संघाच्या शिबिरात ३० खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील १२ खेळाडूंची काल अंतिम महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.
प्रो कबड्डी स्टार खेळाडू सिद्धार्थ देसाईला महाराष्ट्राच्या अंतिम संघात देण्यात आला आहे. पण सिद्धार्थ देसाई रेल्वेचा खेळाडू असून त्याने रेल्वेच्या आंतर रेल्वे कबड्डी स्पर्धेत दक्षिण-मध्य रेल्वेला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्या स्पर्धेत सिद्धार्थ देसाईला सर्वांत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते. पण रेल्वेच्या शिबिराला गैरहजर राहिल्यामुळे रेल्वेच्या अंतिम संघातील स्थान त्याने गमावले आहे.
महाराष्ट्र संघात खेळण्यासाठी सिद्धार्थ देसाईने रेल्वेचा राजीनामा दिला, पण रेल्वेने त्याचा राजीनामा स्वीकारला नाही. रेल्वेकडून ना हरकत प्रमाणपत्र हे त्याला मिळत नसल्यामुळे त्याला आता महाराष्ट्र संघात ही खेळता येणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे. सिद्धार्थने राजीनामा दिला असला तरी त्याची मंजुरी आणि अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावरच त्याचा महाराष्ट्राकडून खेळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल.
याबद्दल महा स्पोर्ट्सशी बोलताना सिद्धार्थने महाराष्ट्राकडून खेळण्याचा आशावाद व्यक्त केला. “मला महाराष्ट्र संघातून खेळण्याची इच्छा आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत मी महाराष्ट्राकडूनच खेळणार आहे. बाकी जे काही सुरु आहे त्यावर मी जास्त काही बोलू शकत नाही.” असे सिद्धार्थ म्हणाला.
रोहा येथे होणाऱ्या ६६ व्या वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धाला अजून ६ दिवस शिल्लक आहे. यामुळे येत्या ६ दिवसांत काय होते यावरच सिद्धार्थचे महाराष्ट्रकडून खेळणे नक्की होणार आहे.
प्रो कबड्डी २०१८चा हंगाम गाजवला-
सिद्धार्थने प्रो कबड्डीचा २०१८चा हंगाम चांगलाच गाजवला. या हंगामात यु मुंबाकडून खेळताना २१ सामन्यांत २२१ गुणांची कमाई केली. यातील तब्बल २१८ गुण त्याने रेडिंगमधून घेतले होते. या हंगामात सर्वाधिक गुणांची कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो तिसऱ्या स्थानावर राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
–राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर, महाराष्ट्राचे दोन्हीं संघ ग गटात
–राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांची विजयी सलामी
–ठाण्यातील काल्हेर येथे होणाऱ्या सरपंच चषक कबड्डी स्पर्धेबद्दल सर्वकाही
–विश्वनाथ स्पोर्ट मीट कबड्डी स्पर्धेत गरवारे महाविद्यालयाचा शानदार विजय
–आयसीसी पुरस्कारात बाजी मारणाऱ्या किंग कोहलीने केले हे खास ५ विक्रम
–या ४ भारतीय क्रिकेटपटूंना २००४पासून मिळाले आहेत सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचे पुरस्कार
–२१वर्षीय रिषभ पंत ठरला आयसीसीचा ‘उद्योन्मुख खेळाडू’