---Advertisement---

सिद्धार्थ देसाई झाला करोडपती, यू मुम्बा नाही तर या संघात झाला सामील

On: सोमवार, एप्रिल 8, 2019 7:26 PM
---Advertisement---

प्रो कबड्डीच्या 7 व्या मोसमासाठी आज मुंबईत लिलाव सुरु आहे.  या लिलावात 6 व्या मोसमात यू मुम्बाकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या सिद्धार्थ देसाईकडे सर्वांचेच लक्ष होते. त्याला मोठ्या रकमेची बोली लागेल असे बोललेही जात होते. अखेर ही गोष्ट खरी ठरली असून त्याला तेलगू टायटन्सने 1 कोटी 45 लाख रुपयांची बोली लावत संघात घेतले आहे.

त्यामुळे तो आत्तापर्यंतचा या 7 व्या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. सिद्धार्थ या लिलावात अ श्रेणीमध्ये होता. त्यामुळे त्याची या लिलावातील मुळ किंमत ही 30 लाख अशी होती.

सिद्धार्थने मागील मोसमात प्रो कबड्डीमध्ये पदार्पण करताना शानदार कामगिरी केली होती. त्याने प्रो कबड्डीच्या साहव्या मोसमात रेडींग आणि टॅकल पॉईंट मिळून 221 पॉइंट मिळवले होते. यातील 218 पॉइंट्स त्याने रेडींगमध्ये मिळवले होते. तो 6 व्या मोसमात सर्वाधिक रेडींग पॉइंट मिळवणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता.

मुंबईत सुरु असणारा हा लिलाव आज आणि उद्या असा दोन दिवस चालणार आहे. या लिलावात बोलीसाठी ४७० खेळाडु उपलब्ध असून १२ संघ आपला संघ विकत घेण्यासाठी बोली लावणार आहेत. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त २५ तर कमीतकमी १८ खेळाडु घेता येणार आहेत. त्यात कमीत कमी २ तर जास्तीत जास्त ४ विदेशी खेळाडु घेता येणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment