आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करणार आहे. त्यासाठी त्यांनी नामांकने जाहीर करण्यास सुरुवात केली. 2022 या वर्षातील सर्वोत्कृष्ट वनडे व टी20 क्रिकेटपटूंची नामांकने गुरुवारी (29 डिसेंबर) जाहीर केली. या दोन्ही पुरस्कारांसाठी नामांकने मिळवणारा एकमेव खेळाडू झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझा हा ठरला. त्याची वर्षभरातील एकूण कामगिरी पाहिल्यास तो या दोन्ही पुरस्कारांसाठी मोठा दावेदार असल्याचे दिसत आहे.
आयसीसीने वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष वनडे क्रिकेटपटू या विभागासाठी सिकंदर रझा, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, वेस्ट इंडीजचा शाई होप व ऑस्ट्रेलियाचा ऍडम झंपा यांना नामांकित केले. तर, सर्वोत्कृष्ट पुरुष टी20 क्रिकेटपटू या विभागात रझासह, भारताचा सूर्यकुमार यादव, पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान व इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन यांना नामांकित केले. मात्र, या दोन्ही विभागात पुरस्कार मिळवण्यासाठी रझा हाच सर्वात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
The ICC Men’s T20I Cricketer of the Year 2022 nominees include:
🤩 An exciting young talent
🔥 Two reliable batters
💥 A swashbuckling power-hitter#ICCAwards | Find out 👇— ICC (@ICC) December 29, 2022
नामांकित इतर सर्व खेळाडू हे फलंदाज अथवा गोलंदाज आहेत. मात्र, रझा हा अष्टपैलू असून, त्याने कामगिरी देखील तशीच करून दाखवली आहे. वनडे क्रिकेटचा विचार केल्यास त्याने 2022 मध्ये 15 सामने खेळताना 49.61 अशा जबरदस्त सरासरीने 645 धावा काढल्या. तसेच 8 बळी मिळवलेले. बांगलादेश दौऱ्यावर झिम्बाब्वे संघाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. या मालिकेत त्याने सलग दोन शतके झळकावली होती. तसेच, भारतीय संघाविरुद्ध देखील त्याने शतक साजरे केले होते.
👀 Two stylish batters
💫 A spin-bowling wizard
🔥 An all-round superstarWe have some exciting talents as our ICC Men's ODI Cricketer of the Year nominees.#ICCAwards | Find out 👇
— ICC (@ICC) December 29, 2022
टी20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी आणखीनच चमकदार झाली. 24 सामन्यांमध्ये त्याने 735 धावा व 25 बळी अशी दर्जेदार कामगिरी करून दाखवली. टी20 विश्वचषकात त्याच्याच खेळाच्या जोरावर झिम्बाब्वे संघाने सुपर 12 फेरीत प्रवेश केला. तसेच, पाकिस्तानला पराभूत करण्याची संस्मरणीय कामगिरी करून दाखवली. स्पर्धेचा सर्वोत्तम खेळाडू होण्याच्या शर्यतीतही तो तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
त्यामुळे यावर्षी या दोन्ही पुरस्कारांसाठी तो योग्य उमेदवार असल्याचे अनेक माजी क्रिकेटपटूंकडून बोलले जात आहे.
(Sikandar Raza Top Contender For 2022 ICC ODI And T20 Player Of The Year Award)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा ‘राशिद राज’! नबीनंतर ‘या’ प्रकारात सांभाळणार नेतृत्वाची जबाबदारी
क्लासिक केन! विलियम्सनच्या नाबाद द्विशतकाने पाकिस्तान बॅकफूटवर; कराची कसोटीला निर्णायक वळण