नुकताच इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १५वा हंगाम पूर्ण झाला आहे. यंदाच्या हंगामात अनेक युवा खेळाडूंनी आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन केले. अनेक युवा खेळाडूंनी यंदा आयपीएलमध्ये पदार्पण केले. यातीलच एक खेळाडू म्हणजे सिमरजीत सिंग. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून सिमरजीतला खेळण्याची संधी मिळाली. अनेक खेळाडू क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी उत्सुक असतात आणि जेव्हा त्यांना पदार्पणाची संधी मिळते तीही भारताचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात ती संधी सोन्याहून पिवळी मानली जाते.
यंदाच्या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नईसाठी सिमरजीत सिंग (Simarjeet Singh) याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र, आपल्या पदार्पणाच्या सामन्यात आपण दबावात असल्याची कबुली खुद्द सिमरजीतने दिली आहे. सिमरजीतने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या माझ्या पहिल्या सामन्यात मी दबावात होतो. मात्र, एकंदरीत, दबावाच्या परिस्थितीत शांत राहणे मी धोनीकडून शिकलो. टीव्हीवर सामना पाहणे ही वेगळी बाब आहे. कारण, एक ओव्हर संपल्यावर काय होते हे कोणालाच कळत नाही. किंबहुना तो नेहमी मार्गदर्शन करतो. मी चांगली गोलंदाजी केल्याचे धोनीने सांगितले. मी त्याचे शब्द कायमचे लक्षात ठेवेल.”
“मला निकालाचा विचार करायचा नाही. मला फक्त क्रिकेटचाच विचार करायचा आहे, कोणता क्रिकेटपटू मला अधिक चांगला बनवतो. त्यामुळे मी नेहमी माझे शंभर टक्के कसे देऊ शकतो याचा विचार करत राहिलो. निकाल माझ्या हातात नसतो. जे घडेल ते घडेल. मी प्रथम माझ्या कौशल्यांवर टिकून राहण्याचा प्रयत्न करत होतो. मी फक्त माझे सर्वोत्तम कौशल्य दाखवण्यावर लक्ष केंद्रित करत होतो,” असेही पुढे सिमरजीत म्हणाला.
दरम्यान, चेन्नई संघाचा मुख्य गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) आयपीएल सुरू होण्यापूर्वीच दुखापतग्रस्त झाला होता. या दुखापतीमुळे त्याला संपूर्ण आयपीएलच्या हंगामाला मुकावे लागले. त्यामुळे चेन्नईला एक नवीन वेगवान गोलंदाजाची आवश्यकता होती. त्याच्यासाठी चेन्नईने ख्रिस जॉर्डन सारख्या अनेक गोलंदाजांचा प्रयोग करून पाहिला. त्यानंतर अखेर हैदराबादविरुद्धच्या सामन्यात सिमरजीतला खेळण्याची संधी मिळाली.
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्टोक्सला वाढदिवशी नशिबाची साथ, क्लीन बोल्ड असूनही पंचांनी दिले जीवदान, नेमकं झालं तरी काय?
“जर गांगुलीने माझी साथ दिली नसती, तर त्याला कर्णधारपद सोडावे लागले असते”