सोमवारी (16 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करून विश्वचषक 2023 मध्ये आपला पहिला विजय नोंदवला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत श्रीलंकेला फार मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. त्यानंतर सुरुवातीच्या धक्क्यांनंतरही सामना जिंकण्यात त्यांनी यश मिळवले. मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा बास झाल्यानंतर काहीसा संतप्त झाला होता. त्यावर आता न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू व समालोचक सायमन डूल याने प्रतिक्रिया दिली आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याला बाद देण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला. मदुशंका यांनी टाकलेल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पायचितचे अपील झाले. पंचांनी श्रीलंकेच्या बाजूने निर्णय देत वॉर्नर याला बाद ठरवले. वॉर्नर याने तिसऱ्या पंचांची मदत घेतली. मात्र, हा अंपायर्स कॉल असल्याने वॉर्नरला बाद व्हावे लागले. पंचांनी नाबाद ठरवले असते तर वॉर्नर बचावला असता. हा निर्णय न पटल्याने वॉर्नरने आपली बॅट जोरात आढळली व तो काही पुटपुटत ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला .
याबद्दल बोलताना डूल म्हणाले,
“इथे वॉर्नरची काही मॅच फीस नक्की कापायला हवी. त्याने पंचांना शिवी दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे न झाल्यास काहीतरी गडबड आहे असे मला वाटेल. तू बाद आहे आणि हे स्वीकार करणे गरजेचे आहे.”
लखनऊ येथे खेळल्या गेलेल्या या विश्वचषकाच्या 14 व्या सामन्यात, श्रीलंकेची चांगली सुरुवात झाल्यानंतरही गडबड झाली आणि संपूर्ण षटके न खेळता 43.3 षटकांत 209 धावांवर सर्वबाद झाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर (11) आणि स्टीव्ह स्मिथ (0) यांचे बळी लवकर गमावले, परंतु मिचेल मार्श आणि जोश इंग्लिस यांनी उत्कृष्ट अर्धशतके झळकावून संघाला विजयाच्या जवळ नेले. अखेरीस, ग्लेन मॅक्सवेलने मार्कस स्टॉइनिस (20*) सोबत आपल्या संघाला लक्ष्यापर्यंत नेले.
(Simon Doul Said David Warner Will Be Penalty Due To Abusing Umpires)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या विजयाने बदलली पॉईंट्स टेबलची स्थिती, पाहा कोण, कुठल्या स्थानी उभा?
विश्वचषकात पुन्हा होणार उलटफेर? नेदरलँड्स देणार का दक्षिण आफ्रिकेला धक्का?