भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठत मोठा इतिहास रचला आहे. तिने अंतिम फेरी गाठताना आपले रौप्य पदक कायम केले आहे.
तिने ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या चेन युफेईचा २१-१३, २१-१० असा उपांत्यपूर्व फेरीत पराभव केला. काल भारताची दुसरी बॅडमिंटनपटू साईना नेहवाल पराभूत झाल्यावर भारतीयांच्या सर्व अपेक्षा सिंधूवर होत्या. तिने काल मिळालेल्या संधीचे सोने केले.
अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय खेळाडू
सिंधूचे हे जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील हे तिसरे पदक असून आजपर्यंत कोणत्याही खेळाडूला अशी कामगिरी करता आली नाही. यापूर्वी २०१३ आणि २०१५ साली तिने कांस्यपदक पटकावले होते. भारताच्या साईना नेहवालने २०१५ला रौप्य आणि २०१७ला कांस्यपदक जिंकले आहे.
सिंधूला मोठी संधी
अंतिम फेरी गाठून सिंधूने आपले रौप्य पदक पक्के केले आहे. परंतु ती जर सुवर्णपदक जिंकली तर अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू बनणार आहे. भारताकडून आजपर्यंत २०१५ला साईना नेहवालचे रौप्य हीच सर्वात चांगली कामगिरी होती.