पाचगणी । रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए योनेक्स सनराईजरवाईन हॉटेल 14 वर्षाखालील नॅशनल सिरीज् टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात कर्नाटकाच्या रोनीन लोटलीकर याने, तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या परी सिंग या खेळाडूंनी मानांकित खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत 14 वर्षाखालील मुलांच्या गटात कर्नाटकाच्या अकराव्या मानांकित रोनीन लोटलीकरने तिसऱ्या मानांकित आपलाच राज्य सहकारी आयुष भटचा 6-1, 7-5असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. चौथ्या मानांकित मध्यप्रदेशच्या आयुषमान अर्जेरीयाने कर्नाटकाच्या अन्मय देवराजूचा 6-3, 6-2असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीच्या लढतीत महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित परी सिंगने अव्वल मानांकित राधिका महाजनचा 4-6, 6-2, 6-2असा पराभव करून सनसनाटी निकाल नोंदवत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकित वैष्णवी आडकरने अकराव्या मानांकित तामिळनाडूच्या कुंदना बंदारूचा 6-2, 6-3असा पराभव करून आगेकूच केली.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात विशेष पटेलने अर्जुन गोहाडच्या साथीत तरुण व्हेटरीवेलन व प्रणव रेथीन यांचा 7-5, 6-1 असा तर, अन्मय देवराजू व आयुष भट यांनी अग्रिया यादव व मानस धामणे यांचा 6-1, 6-3असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी: परी सिंग(महा)(7)वि.वि.राधिका महाजन(महा)(1)4-6, 6-2, 6-2; वैष्णवी आडकर(महा)(2)वि.वि.कुंदना बंदारू(11) 6-2, 6-3;
14 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी: रोनीन लोटलीकर(कर्नाटक)(11)वि.वि.आयुष भट(कर्नाटक)(3)6-1, 7-5; आयुषमान अर्जेरीया(4)वि.वि.अन्मय देवराजू(कर्नाटक)(5) 6-3, 6-2;
दुहेरी गट: उपांत्यपूर्व फेरी: 14 वर्षाखालील मुले: विशेष पटेल/अर्जुन गोहाड(1) वि.वि.तरुण व्हेटरीवेलन/प्रणव रेथीन 7-5, 6-1; अरुणवा मजुमदार/शिवम कदम वि.वि.जोशुआ ईपन/अँडी थॉसेन 7-5, 7-5; रोनीन लोटलीकर/मोनील लोटलीकर(4) वि.वि.अर्जुन प्रेमकुमार/अनर्घ गांगुली 5-7, 6-0, 10-7; अन्मय देवराजू/आयुष भट(2)वि.वि.अग्रिया यादव/मानस धामणे 6-1, 6-3;
14 वर्षाखालील मुली: हर्षाली मांडवकर/वैष्णवी आडकर(1)वि.वि.अभया वेमुरी/अपूर्वा वेमुरी 4-6, 6-2, 10-2; सूर्यांशी तन्वर/मधुरिमा सावंत वि.वि.सुहानी सभारवाल/सोनल पाटील 6-3, 6-1; भूमिका त्रिपाठी/कशिश बोटे(4)वि.वि.लक्ष्मी अरुणकुमार/सायना देशपांडे 6-2, 6-4; कुंदना बंदारू/अमीशी शुक्ला वि.वि.हतवीर चौधरी/परी सिंग 6-2, 3-6, 10-7.