---Advertisement---

हा खेळाडू आपल्या देशाकडून खेळलाय दोन वेगवेगळ्या खेळांचे विश्वचषक

On: शुक्रवार, मार्च 13, 2020 2:24 PM
---Advertisement---

जगभरातील अनेक लोकांचे स्वप्न असते की आपल्या देशासाठी खेळावे आणि मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी करावी. अशाच वेळी एका खेळाडूला 2 वेगवेगळ्या खेळांच्या विश्वचषकामध्ये सहभागी होण्याचे भाग्य लाभणे दुर्मिळच. पण असे दुर्मिळ भाग्य वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांना लाभले आहेय त्यांनी क्रिकेट विश्वचषकाबरोबरच फुटबॉल विश्वचषकही खेळला आहे. 

रिचर्डस हे 1975 आणि 1979 च्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवलेल्या वेस्ट इंडिज संघाचे भाग होते. तसेच त्यांनी 1974 च्या फुटबॉल विश्वचषकाच्या पात्रता फेरीत अँटिग्वा आणि बार्बुडा बेटाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र त्यावेळी अँटिग्वाला त्यांच्या गटात शेवटचे स्थान पत्करावे लागले होते.

यानंतर रिचर्डस यांची फुटबॉल कारकिर्द तेवढी बहरली नाही, मात्र त्यांनी क्रिकेटमध्ये मोठा नावलौकीक मिळवला. रिचर्ड्सनी वेस्ट इंडिजकडून 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या –

स्टँडमध्ये गेलेला बॉल आणणार कोण? क्रिकेटपटूंसमोर मोठा प्रश्न

ऑस्ट्रेलियाच्या या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण?

 संपुर्ण यादी- रणजी ट्राॅफी स्पर्धेचे आजपर्यंतचे सर्व विजेते आणि उपविजेते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---