लंडन। द ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 225 धावा केल्या. त्यांच्याकडून या डावात स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक 145 चेंडूत 80 धावांची खेळी केली.
2019 ऍशेस मालिकेतील स्मिथची ही 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याची सहावी वेळ आहे. विशेष म्हणजे त्याने सलग सहा डावात 75 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
त्यामुळे त्याने एका कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याच्या 64 वर्षांपूर्वीच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे.
याआधी 64 वर्षांपूर्वी 1955 मध्ये वेस्टइंडीजच्या क्लाइड वॉलकोट यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत सहा वेळा 75 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली होती. यामध्ये त्यांच्या 5 शतकांचा समावेश आहे.
स्मिथने या 2019 ऍशेस मालिकेत 1 द्विशतक, 2 शतके आणि 3 अर्धशतके केली आहे. त्याने या ऍशेसमध्ये खेळलेल्या 6 डावात अनुक्रमे 144, 142, 92, 211, 82, 80 अशा धावा केल्या आहेत.
द ओव्हलवर सुरु असलेल्या पाचव्या ऍशेस कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाखेर(13 सप्टेंबर) इंग्लंडने दुसऱ्या डावात बिनबाद 9 धावा केल्या असून जो डेन्ली (1) आणि रॉरी बर्न्स(4) नाबाद खेळत आहेत.
तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 225 धावांवर बाद झाल्याने इंग्लंडने 69 धावांची आघाडी घेतली आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 294 धावा केल्या होत्या. त्यामुळे इंग्लंड सध्या दुसऱ्या दिवसाखेर 78 धावांनी आघाडीवर आहेत.
Steve Smith's scores since shirt numbers were introduced into Test cricket
1️⃣4️⃣2️⃣ & 1️⃣4️⃣4️⃣ 👉 Edgbaston
9️⃣2️⃣ 👉 Lord's
2️⃣1️⃣1️⃣ & 8️⃣2️⃣ 👉 Old Trafford
7️⃣5️⃣ * 👉 The OvalNot one score below his shirt number 👏👏👏 pic.twitter.com/1YPZqGygzf
— ICC (@ICC) September 13, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–कोणालाही आवडणार नाही असा विक्रम करणारा वॉर्नर पहिलाच सलामीवीर फलंदाज
–व्हिडिओ: ऑस्ट्रेलियाचा हा क्रिकेटपटू म्हणतो, ‘अनेक ऑस्ट्रेलियन्स माझा तिरस्कार करतात’
–ज्या मैदानात १८ वर्षांपूर्वी विराटने भावाबरोबर सामना पाहिला त्याच मैदानात झाला त्याचा मोठा सन्मान