---Advertisement---

ट्विटरवर आमने-सामने आले पडद्यावरील आणि प्रत्यक्षातील ‘कबीर खान’; झाले ‘असे’ संभाषण

---Advertisement---

जपानची राजधानी टोकियो येथे खेळल्या जात असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या दहाव्या दिवशी (२ ऑगस्ट) भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला. उपांत्यपूर्व सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाला पराभूत करत राणी रामपाल हिच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर भारतीय महिला खेळाडूंसह संघाचे प्रशिक्षक सोर्ड मार्जेन यांचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे. त्यानंतर, मार्जेन यांनी प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्या अभिनंदनपर ट्विटला मजेदार उत्तर दिले.

सोर्ड मार्जेन यांनी शाहरुखला दिले मजेदार उत्तर
भारतीय महिला संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर सोर्ड मार्जेन यांचे भारतीय चाहते कौतुक करत आहेत. त्यांची तुलना काहींनी चक दे चित्रपटातील शाहरुख खान याच्याशी केली जात आहे. शाहरूखने या चित्रपटात महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका केली होती.

भारतीय संघाने ऑलिम्पिक उपांत्य फेरीत प्रवेश केल्यानंतर शाहरुखने मार्जेन यांच्या ट्विटला कोट करत लिहीले, ‘हो..हो..हरकत नाही. परत येताना थोडे सोने आणा. कुटुंबातील एक अब्ज सदस्यांसाठी. यावेळी धनत्रयोदशी देखील २ नोव्हेंबर रोजी आहे. प्रेषक: माजी प्रशिक्षक कबीर खान.’

यावर उत्तर देताना मार्जेन यांनी उत्तर दिले, ‘सर्वांच्या समर्थनासाठी आणि प्रेमाबद्दल धन्यवाद! आम्ही पुन्हा सर्व काही देऊ. प्रेषक: खरा प्रशिक्षक’

यावर चाहत्यांनी अनेक गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

चार वर्षापासून प्रशिक्षक आहेत मार्जेन
हॉलंडचे माजी खेळाडू राहिलेल्या सोर्ड मार्जेन यांनी २०१७ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. २०१८ मध्ये ते पुरुष संघाचे देखील प्रशिक्षक होते. मात्र, त्यांच्याकडे पुन्हा महिला संघाचे जबाबदारी देण्यात आली. अनेक वरिष्ठ खेळाडू निवृत्त झाल्यानंतरही मार्जेन यांनी संघाकडून उत्कृष्ट कामगिरी करून घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टोकियो ऑलिम्पिक: सोमवारी ‘अशी’ राहिली भारताची कामगिरी; ११ व्या दिवसाचे असणार ‘असे’ वेळापत्रक

भारताच्या ‘या’ शहरात बनतेय सर्वात मोठे हॉकी स्टेडियम, भूषवणार विश्वचषकाचे यजमानपद

चक दे इंडिया! पुरुष आणि महिला हॉकी संघाची टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---