पुढील वनडे विश्वचषकाचे आयोजन भारतात ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. या स्पर्धेत जगातील बलाढ्य क्रिकेट संघ भाग घेतील. या स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंड संघाचाही समावेश आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये इंग्लंड वर्चस्व गाजवत आहे. या क्रिकेट प्रकारात दमदार प्रदर्शन करणाऱ्या इंग्लंडने 2019च्या वनडे विश्वचषकात न्यूझीलंडला धूळ चारत पहिले-वहिले विजेतेपद पटकावले होते. इंग्लंडला विजेते बनवण्यात अष्टपैलू बेन स्टोक्स याने सिंहाचा वाटा उचलला होता. मागील काही काळापासून इंग्लंड क्रिकेटमधील सर्वात मोठी चर्चा ही, स्टोक्सच्या वनडे क्रिकेटमधील पुनरागमनाविषयी आणि विश्वचषकातील त्याच्या उपलब्धतेविषयी होत आहे. अशात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने या चर्चेला काही वेळासाठी का होईना पूर्णविराम लावला आहे.
कर्णधार बटलर करतोय स्टोक्सशिवाय विश्वचषक खेळण्याची तयारी
इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलर (Jos Buttler) याने खुलासा केला की, संघ बेन स्टोक्स (Ben Stokes) याच्याशिवाय आगामी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) स्पर्धेची योजना बनवत आहे. खरं तर, स्टोक्स याने क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकाचे कारण देत 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारातून निवृत्ती घेतली होती. मात्र, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील इंग्लंड संघाचे प्रशिक्षक मॅथ्यू मॉट यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, ते 31 वर्षीय स्टोक्सला काहीही करून विश्वचषकाती इंग्लंड संघाचा भाग बनवायचे आहे.
शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी माध्यमांशी बोलताना बटलरने भाष्य केले. तो म्हणाला की, सध्या ते स्टोक्सचा समावेश न करता योजना आखत आहेत. माध्यमांतील वृत्तांमध्ये, बटलरच्या हवाल्याने म्हटले की, “जर त्याला निर्णय बदलायचा असेल, तर निश्चितरीत्या त्याचे स्वागत केले जाईल. मात्र, आम्ही ही योजना त्याच्याशिवाय बनवत आहोत.”
बेन स्टोक्सने इंग्लंडला बनवले होते चॅम्पियन
इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही त्याच्या देशाचा सर्वात मोठा अष्टपैलू आहे. त्याने 2019च्या वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या 241 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जबरदस्त खेळी साकारली होती. त्याने त्यावेळी 98 चेंडूत 84 धावांची नाबाद खेळी साकारली होती. यानंतर टी20 विश्वचषक 2022च्या अंतिम सामन्यातही स्टोक्सने मोठी कामिगरी करत इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले होते. सध्या इंग्लंड संघाच्या गोटातून येत असलेल्या बातम्यांनुसार, भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023मधून इंग्लंडला स्टोक्सशिवाय मैदानात उतरावे लागू शकते. (skipper jos buttler confirms england planning to play without all rounder ben stokes in odi world cup 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! घातक इंग्लिश गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन
रांची टी20 मध्ये हार्दिक ‘टॉस का बॉस’! प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पृथ्वी बाकावरच