आधी चेन्नई आणि नंतर जयपूर अशा दोन्ही ठिकाणी झालेल्या राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघातील सामन्यात 4 वेळच्या चॅम्पियनला पराभवाचा धक्का बसला. राजस्थानने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडिअमवर गुरुवारी (दि. 27 एप्रिल) महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाला 32 धावांनी पराभवाचा धक्का दिला. याव्यतिरिक्त नेहमी अचूक निर्णय घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या धोनीचा निर्णय चुकीचा ठरला. चला सविस्तर जाणून घेऊयात…
राजस्थान संघाने आयपीएल 2023च्या 37व्या सामन्यात चेन्नईविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 202 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला होता. या धावा करताना राजस्थानकडून 21 वर्षीय सलामीवीर यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याने 43 चेंडूत 77 धावांची वादळी खेळी साकारली. यामध्ये 4 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता.
यशस्वीने अवघ्या 26 चेंडूत आपले अर्धशतक साकारले. 2021मध्ये राजस्थानकडून आयपीएल पदार्पण करणाऱ्या यशस्वीने चेन्नईविरुद्ध 5 डावात तिसरे अर्धशतक झळकावले. जयसवानंतर ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांच्यातही 48 धावांची भागीदारी झाली. त्यासाठी त्यामुळे राजस्थानने जयपूरच्या मैदानावर पहिल्यांदाच 200 धावांचा आकडा पार केला. खरं तर, राजस्थानचा हा 200वा सामना आहे.
Yashasvi '????????????????????????????????????????????' Jaiswal ????@ybj_19 brings up an explosive 5️⃣0️⃣ against #CSK ????????#RRvCSK #IPLonJioCinema #TATAIPL #IPL2023 #PaybackTime pic.twitter.com/BXMoZSRs2B
— JioCinema (@JioCinema) April 27, 2023
या सामन्यात राजस्थानचा सलामीवीर फलंदाज जयसवालने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते पाहून एमएस धोनी (MS Dhoni) भलताच चिंतेत होता. त्यामुळे त्याने चौथ्या षटकातच वेगवान गोलंदाजाला हटवत फिरकीपटूंना चेंडू सोपवला. महीश थीक्षणा चौथ्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी आला. त्याच्या तिसऱ्या चेंडूवर यशस्वी जयसवालविरुद्ध एलबीडब्ल्यू म्हणजेच पायचीतसाठी अपील केली. मात्र, पंचांनी नकार दिला. यावेळी धोनीने रिव्ह्यू घेतला, पण हा रिव्ह्यू त्याच्या बाजूने गेला नाही.
धोनीने डीआरएस (Decision Review System) घेण्याचा अर्थ असा असतो की, फलंदाजाने आता तंबूत जाण्याची तयारी करावी. मात्र, क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा असे झाले आहे, जेव्हा धोनीने रिव्ह्यू घेतला असेल आणि फलंदाज नाबाद राहिला असेल. धोनीच्या अचूक रिव्ह्यू घेण्याच्या निर्णयामुळे चाहते डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टम (Dhoni Review System) असेही म्हणतात.
तर झाले असे की, थीक्षणाच्या तिसऱ्या चेंडूवर जयसवालने स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू बॅटवर आला नाही आणि पॅडला लागून ऑफ साईडला गेला. यावेळी युवा फलंदाज धाव घेण्यासाठी धावला आणि अशातच गोलंदाजाने एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. मात्र, पंचांनी नकार दिला. यानंतर धोनीने रिव्ह्यू घेतला असता, रिव्ह्यूमध्ये स्पष्ट दिसले की, चेंडू स्टंपच्या बाहेर खेळपट्टीवर होता. त्यामुळे धोनीचा हा निर्णय चुकीच ठरला.
यानंतरही धोनीच्या गोलंदाजांचा राजस्थानच्या फलंदाजांनी भरपूर समाचार घेतला. तसेच, जयसवाल याने जोस बटलर याच्यासोबत मिळून पॉवरप्लेच्या 6 षटकात एकही विकेट न गमावता 64 धावा चोपल्या. चेन्नईला पहिली विकेट 9व्या षटकात रवींद्र जडेजा याने घेऊन दिली. बटलर 21 चेंडूत 27 धावा करून बाद झाला. मात्र, राजस्थानने पुढे 202 धावांचा पाऊस पाडला. हे आव्हान पार करताना चेन्नईचे फलंदाज अपयशी झाले. चेन्नईला फक्त 170 धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने हा सामना 32 धावांनी खिशात घातला. (skipper ms dhoni took a review and lost it in 4th overs against youngster yashasvi jaiswal)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रॉयल नाम सुनकर आरसीबी समझे क्या? RCB नहीं…’, चेन्नईच्या पराभवानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस
रहाणेला उगाच नाही मिळाली टीम इंडियात जागा, समोर आला धोनीचा अँगल; लगेच वाचा






