ऑस्ट्रेलियन संघ संध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी (२९ जून) सुरू झाला. सामन्याच्या पहिल्याच दिवसी ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने वयाच्या ३५ व्या वर्षीही त्याच्यामध्ये असलेल्या चपळाई दाखवून दिली.
श्रीलंकन संघ पहिल्या डावात स्वस्तात गुंडाळला गेला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी डेविड वॉर्नर (David Warner) आणि त्याच्या सहकारी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जबरदस्त प्रदर्शन केले. वॉर्नरने पहिल्या दिवशी स्लिप्समध्ये उभा असताना डाईव्ह मारून एक जबरदस्त झेल पकडला, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे. वॉर्नरने एका हातात पडलेला हा झेल सोशल मीडियावर देखील चांगलाच व्हायरल होत आहे.
हा प्रसंग सामन्याच्या पहिल्या दिवशी श्रीलंकन संघ फलंदाजी करत असताना घडला. श्रीलंकेच्या पहिल्या डावातील ३० वे षटक टाकण्यासाठी नाथन लायन आला होता. लायनच्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) डिफेंस करण्याच्या प्रयत्नात होता, पण त्याला चेंडू व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही. चेंडू बॅटच्या आतमधल्या किनाऱ्याला लागून पॅडला लागला.
चेंडू पॅडवर लागल्यानंतर ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक आणि इतर सर्वांना एलबीडब्ल्यूसाठी अपील केली. परंतु स्लिप्समध्ये उभ्या असलेल्या वॉर्नरचे चेंडूवर बारीक लक्ष होते आणि त्याला आधीच समजले होते की, चेंडू बॅटला लागला आहे. अशात पॅडला आदळलेला चेंडू जसा हवेत उडाला तितक्यात वॉर्नने धाव घेतली आणि शेवटच्या क्षणी डाईव्ह मारून झेल पकडला. डावा हात पुढे करून त्याने हा झेल पकडला आणि या उत्कृष्ट कामगिरीसाठी सर्वांनीच त्याची पाठ थोपटली.
सलामीसाठी आलेला करुणारत्ने ८४ चेंडू खेळला आणि २८ धावा करून वॉर्रनच्या हातात झेलबाद झाला. तसेच सलामीवीर पाथून निसांकाही अवघ्या २३ धावा करून बाद झाला. यष्टीरक्षक फलंदाज निरोशन डिकवेलाने सर्वाधिक ५९ धावांची खेळी केली. तर एंजेलो मॅथ्यूजनेही ३९ धावांचे योगदान दिले. पहिल्या डावात श्रीलंकन संघ अवघ्या २१२ धावांवर गुंडाळला गेला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियनानेही ९८ धावा करून ३ विकेट्स गमावल्या. वॉर्नर २५ धावा करून स्वस्तात बाद झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळीनंतरही भरले नाही संजूचे मन; म्हणाला, ‘माझ्याकडे संधी होती, पण…’
भारताच्या ऑलिम्पियन हॉकीपटूवर मित्राच्या हत्येचा आरोप, अपार्टमेंटमध्ये लटकलेला आढळलेला देह
शतकवीर दीपक हुड्डाने सांगितले त्याच्या यशामागचे रहस्य; म्हणाला, ‘जास्त दूरचा विचार…’






