---Advertisement---

पदार्पणाच्या सामन्यातच ऑस्ट्रेलियन फलंदाजाची शतकी खेळी, श्रीलंका बॅकफूटवर

On: गुरूवार, जानेवारी 30, 2025 3:46 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज जोश इंगलिसने श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले आहे. गॅले येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत त्याने 90 चेंडूत शतक ठोकले. ऑस्ट्रेलियासाठी गेल्या काही सामन्यांमध्ये तीन खेळाडूंनी पदार्पण केले आहे आणि त्या तिघांनीही खेळाच्या सर्वात लांब स्वरूपात पहिल्या डावात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जोशने 94 चेंडूत 10 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 102 धावांची खेळी खेळली.

सॅम कॉन्स्टासने भारताविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. मेलबर्नमधील बॉक्सिंग डे कसोटीत त्याने पदार्पणातच शानदार 60 धावा केल्या. पुढील तीन डावांमध्ये त्याने 8, 23 आणि 22 धावा केल्या. मात्र, श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही.

भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत ब्यू वेबस्टरने ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात त्याने 57 धावा केल्या आणि त्यानंतर ब्यू वेबस्टरने दुसऱ्या डावात 39 धावा केल्या. त्याने चेंडूनेही चमत्कार केले. ब्यूनेही एक विकेट घेतली.

दरम्यान, गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. प्रभात जयसूर्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर धाव घेत उस्मान ख्वाजाने 290 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. यासह, तो श्रीलंकेत द्विशतक करणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू बनला. यादरम्यान त्याने 16 चौकार आणि एक षटकार मारला.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या डावात खेळताना ऑस्ट्रेलियाने या बातमीखेरीस 145 षटके खेळून पाच गड्यांच्या मोबदल्यात 608 धावा केल्या आहेत. सध्या क्रीझवर अ‍ॅलेक्स कॅरी (28) आणि ब्यू वेबस्टर (14) धावांवर नाबाद आहेत.

हेही वाचा-

पुण्यात विजय मिळवणं टीम इंडियासाठी अवघड? सामन्यापूर्वी संघ व्यवस्थापनासमोर प्रश्नांचा भडीमार
आधी शतक आता हॅट्ट्रीक, मुंबईचा हा खेळाडू रणजी ट्राॅफीमध्ये घालतोय धुमाकूळ, टीम इंडियामध्ये परतणार?
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी टीम इंडिया पुण्यात पोहोचली, मालिकेत भारताची 2-1 ने आघाडी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---