भारताचा मर्यादीत षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. आता या वनडे मालिकेनंतर रविवारपासून (२५ जुलै) यजमान श्रीलंका विरुद्ध भारत संघात ३ सामन्यांची टी२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील सर्व ३ सामने आर प्रेमदासा स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहेत.
भारतासाठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. कारण टी२० विश्वचषक २०२१ पूर्वी होणारी भारताची ही अखेरची टी२० मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतील सामन्यांसाठी निवडण्यात येणाऱ्या अंतिम ११ जणांच्या संघावरही सर्वांचे लक्ष असणार आहे. आपण या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारताचा संभाव्य ११ जणांचा संघ कसा असू शकतो, याबद्दल जाणून घेऊ.
सलामीवीर – शिखर धवन, देवदत्त पडीक्कल
शिखर धवन भारताचा कर्णधार असल्याने तो पहिल्या टी२० सामन्यात खेळणे निश्चित आहे. त्याच्यासह सलामीला भारतीय संघव्यवस्थापन ऋतुराज गायकवाडला संधी देऊ शकतात. कारण इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय कसोटी संघातील काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले असल्याने श्रीलंका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघातील पृथ्वी शॉ आणि देवदत्त पडीक्कल या दोघांना कदाचीत इंग्लंड दौऱ्यावर पाठवले जाण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत ऋतुराजला पहिल्या टी२० सामन्यातून पदार्पणाची संधी मिळू शकते.
मधली फळी – इशान किशन, संजू सॅमसन, नितीश राणा
मधल्या फळीत इशान किशन, संजू सॅमसन, नितीश राणा यांना संधी दिली जाऊ शकते. शॉ आणि पडीक्कलसह सूर्यकुमारही इंग्लंड दौऱ्यावर जाण्याची शक्यता असल्याने तोही या टी२० मालिकेत सामील न होण्याची शक्यता आहे. तसेच मनिष पांडेचा फॉर्म पाहाता त्याच्याऐवजी नितीश राणालाच संधी मिळण्याची अधीक संधी आहे. इशान आणि सॅमसनपैकी एकजण यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.
अष्टपैलू – हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या
हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून चांगल्या फॉर्ममध्ये दिसलेला नाही. पण तरीही संघव्यवस्थापन त्याच्या अनुभवावर विश्वास ठेवून त्याला संधी देण्याती शक्यता आहे. तसेच हार्दिकही टी२० विश्वचषकासाठी आपली जागा पक्की करण्याच्या प्रयत्नात असेल. त्याचबरोबर हार्दिकचा मोठा भाऊ कृणाललाही पहिल्या टी२० सामन्यासाठी संधी मिळू शकेल. त्याने वनडे मालिकेत चांगली कामगिरी केली होती.
गोलंदाजी फळी – दीपक चाहर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव
वेगवान गोलंदाज म्हणून दीपक चाहर आणि भुवनेश्वर कुमारला संधी मिळू शकते. या दोघांना तिसऱ्या वनडेसाठी विश्रांती देण्यात आली होती. हे दोघेही टी२० विश्वचषकासाठी दावेदारी ठोकण्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत चांगले प्रदर्शन करण्यास उत्सुक असतील. याबरोबरच युजवेंद्र चहलला त्याच्या अनुभवाच्या जोरावर राहुल चाहरच्या आधी संधी दिली जाऊ शकते. तसचे वरुण चक्रवर्तीला पदार्पणाची संधी मिळू शकते.
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल श्रीलंका विरुद्ध भारत संघातील पहिला टी२० सामना? जाणून घ्या सर्वकाही
एकच लक्ष्य, पुनरागमन फक्त; कसोटी संघातून बाहेर असलेला उमेश ट्रेनिंगदरम्यान गाळतोय घाम