श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना गॅले स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच आज (28 सप्टेंबर) शनिवारी फिरकीपटू प्रभात जयसूर्याने जादूई कामगिरी केला. जयसूर्याने ‘किलर सिक्स’ मारत न्यूझीलंडला गोत्यात आणले. श्रीलंकेच्या 602 धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव केवळ 88 धावांवर आटोपला. न्यूझीलंडला फॉलोऑन खेळावे लागले. दरम्यान यजमान श्रीलंकेने पहिल्या डावाच्या जोरावर 514 धावांची मोठी आघाडी घेत इतिहास रचला. श्रीलंकेने पहिल्यांदाच एका कसोटीत इतक्या धावांची आघाडी घेतली आहे.
न्यूझीलंडने तिसऱ्या दिवशी 22/2 धावसंख्येवरून डावाला सुरुवात केली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी लंचब्रेकपूर्वीच न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. ज्यामध्ये जयसूर्याने 18 षटकात 22 धावा देत 6 बळी घेतले. त्याने डेव्हॉन कॉनवे (9), केन विल्यमसन (7), डॅरिल मिशेल (13), टॉम ब्लंडेल (1), कर्णधार टीम साऊदी (2) आणि ग्लेन फिलिप्स (0) यांना बाद केले. तर निशान पेरीसने तीन आणि असिथा फर्नांडोने एक विकेट घेतली. 32 वर्षीय जयसूर्याने कारकिर्दीत नवव्यांदा एका डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. गॅले स्टेडियमवर त्याने आठ वेळा ही कामगिरी केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने एकूण 9 विकेट्स घेतले होते.
THE ICONIC SPELL OF PRABATH JAYASURIYA.
– 6/42 against New Zealand at Galle. pic.twitter.com/MTJk9sj5Xq
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024
कसोटीतील पहिल्या डावात सर्वाधिक धावांची आघाडी
702 इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल 1938
587 दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका, कोलंबो 2006
570 पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, लाहोर 2002
563 इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन 1930
514 श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड, गॅले 2024
श्रीलंकेने 163.4 षटकांत 5 बाद 602 धावा करून पहिला डाव घोषित केला होता. ज्यामध्ये कामिंदू मेंडिस (नाबाद 186), दिनेश चंडिमल (116) आणि कुशल मेंडिस (नाबाद 106) यांनी उत्कृष्ट खेळी खेळली. कामिंदूने मोठा पराक्रम केला. डॉन ब्रॅडमनच्या बरोबरीने सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा तो संयुक्त तिसरा खेळाडू ठरला. त्याने आपल्या 12व्या कसोटी डावात ही कामगिरी केली. ब्रॅडमन यांनी हेडिंग्ले येथे 1930 मध्ये इंग्लंडविरुद्ध केले होते. इंग्लंडचा हर्बर्ट सटक्लिफ आणि वेस्ट इंडिजचा महान एव्हर्टन वीकस यांनी 12 डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
हेही वाचा-
सूर्याच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळेल संधी? बांगलादेशविरुद्ध असा असू शकतो भारताचा टी20 संघ
कानपूर कसोटी पावसानं वाहून गेल्यास WTC गुणतालिकेवर काय प्रभाव पडेल? जाणून घ्या
हा गोलंदाज मोहम्मद शमीचा सर्वाेत्तम रिप्लेसमेंट; संजय मांजरेकरांचा धक्कादायक अंदाज