---Advertisement---

भारताच्या नव्या ‘द वॉल’च्या खात्यात अजून एका कसोटी अर्धशतकाची भर, पण…

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 12:39 PM
---Advertisement---

भारतीय दिग्गज राहुल द्रविड याचा वारसा पुढे नेत असलेल्या चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाची नवी ‘द वॉल’ असेही संबोधले जाते. पुजारा कसोटी क्रिकेटमध्ये अतिशय संथ गतीने फलंदाजी करताना दिसतो. नुकत्याच ब्रिस्बेनमधील द गॅबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात चालू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात पुजाराने कारकिर्दीतील २८ वे अर्धशतक केले आहे. हे त्याचे कारकिर्दीतील सर्वात धिम्या गतीने केलेले अर्धशतक ठरले आहे.

भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात सलामीवीर रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने अतिशय धिम्या गतीने बचावात्मक फलंदाजी करत १९६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर पुढे १५ चेंडूत ६ धावा करत पॅट कमिन्सच्या चेंडूवर पुजारा पायचित झाला.

परंतु ब्रिस्बेन कसोटीतील अर्धशतक ११ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीतील पुजाराचे सर्वात हळूवार अर्धशतक ठरले आहे. यापुर्वी त्याने १८० कमी चेंडूंमध्ये अर्धशतके केली होती. काही दिवसांपुर्वी सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १७४ चेंडूत अर्धशतक केले होते. तर त्याच सामन्यातील दुसऱ्या डावात पुजाराने अर्धशतक करण्यासाठी १७० चेंडू खेळले होते. याशिवाय २०१७-१८ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्ध जोबर्ग येथे झालेल्या कसोटी सामन्यात १७३ चेंडूत पुजाराने अर्धशतक ठोकले होते.

पहिल्यांदा ब्रिस्बेन कसोटी जिंकण्याची संधी –

पुजाराची विकेट पडल्यानंतर भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि मयंक अगरवाल डावास चालना देत आहेत. पंतने तिसऱ्या सत्रापर्यंत चिवट झुंज देत अर्धशतकी खेळी केली आहे. तर मयंक नाबाद १० धावांवर पंतला साथ देत आहे. यामुळे पाचव्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रापर्यंत भारताने २५० हून अधिक धावा केल्या आहेत. आता विजयासाठी भारताला फक्त ७० धावा करायच्या बाकी आहेत. जर भारतीय संघाने हा सामना जिंकला, तर ब्रिस्बेन येथे पहिल्यांदाच कसोटी सामना जिंकण्याची करामत भारतीय संघ करेल.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs AUS Test Live : चेतेश्वर पुजारा ५६ धावा करुन बाद; भारताला अद्याप ९६ धावांची गरज

नॅथनच्या चेंडूवर ‘असा’ पकडला स्मिथने शुबमन गिलचा सोपा झेल, पाहा व्हिडिओ

चौथ्या डावात विदेशात नव्वदीत बाद होणारा गिल ठरला चौथा भारतीय, पाहा कोण आहेत अन्य तीन खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---