वेस्टइंडीज आणि श्रीलंका यांच्यात एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवला आहे. परंतु याच सामन्यात, श्रीलंकन संघाचा फलंदाज दनुष्का गुणातिलका फलंदाजी करत असताना पंचांनी विवादास्पद निर्णय घेत बाद घोषित केले. त्यामुळे सोशल मीडियावर पंचांच्या निर्णयाबाबत विरोध केला जात आहे.
श्रीलंकन संघाचा फलंदाज गुणातिलका अर्धशतकिय खेळी करून आक्रमक फलंदाजी करत असताना वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार कायरन पोलार्ड २२ वे षटक फेकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. तर झाले असे की, पोलार्डने डाव्या हाताचा फलंदाज गुणातिलका याला सरळ चेंडू टाकला. त्या चेंडूवर गुणातिलकाने रक्षात्मक शॉट खेळत एक धाव घेण्याचा प्रयत्न केला.
तो चेंडू पकडण्यासाठी पोलार्ड धावला आणि तो चेंडू गुणातिलकाच्या पायाला लागला. त्यामुळे पोलार्डला तो चेंडू पकडता आला नाही. नंतर पंचांकडे वेस्ट इंडिज संघाने अपील केले. त्यावेळी पंचांनी ऑब्स्ट्रकटिंग द फील्डच्या (क्षेत्ररक्षणात बाधा आणल्यामुळे) नियमानुसार त्याला बाद घोषित केले.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या निर्णयावर गुणातिलका आणि क्रिकेट चाहत्यांनी निराशा व्यक्त केली आहे. व्हिडिओमध्ये पाहिल्यास स्पष्ट दिसून येत आहे की, त्याने मुद्दाम चेंडूला लाथ मारली नाही.
https://twitter.com/CloudyCric/status/1369695372147187714
अनेक क्रिकेट चाहते ट्विट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Agree. https://t.co/fDfj7VbFJ7
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 10, 2021
Danushka Gunathilaka has been given out Obstructing the field. Very difficult to interpret if this was a wilful obstruction. Looks unintentional but has been given out as per the lawspic.twitter.com/CJh3GmzvaN
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) March 10, 2021
Danushka Gunathilaka was given out obstructing the field.
Sri Lanka's ODI clash with the West Indies has exploded in controversy after Danushka Gunathilaka was given out for obstructing the field.
West Indies claimed the first one-day international by 8 wickets win. pic.twitter.com/4aPg3XRTjd— #allsportsupdates (@sohailasif619) March 11, 2021
पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबरच ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ युवा भारतीय खेळाडूची गांगुलीने केली सेहवाग, युवराज आणि धोनी यांच्याशी तुलना
इंग्लंड विरुद्ध पहिल्या टी२० सामन्यासाठी अशी ‘या’ ११ खेळाडूंना मिळू शकते टीम इंडियात संधी
“भारतीय खेळाडूंची तुलना पाकिस्तानी खेळाडूंसोबत करू शकत नाही, कारण पाकिस्तानकडे जास्त टॅलेंट आहे”