सध्या सुरु असलेल्या कॅरेबियन प्रीमीयर लीगमध्ये(सीपीएल) रविवारी (12 आॅगस्ट) गयाना ऍमेझॉन वॉरियर्स विरुद्ध बार्बाडोस ट्रिडेंन्ट्स यांच्यात सामना पार पडला.
या सामन्यातून आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने सीपीएलमध्ये पदार्पण केले. तो या लीगमध्ये बार्बाडोस संघाकडून खेळणार आहे.
या सामन्यात स्मिथकडून चांगला खेळ पहायला मिळाला. पण तो चांगल्या लयीत खेळत असतानाच 14 व्या षटकात फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने त्याला पायचीत बाद केले. यावेळी स्मिथने पंचांच्या निर्णयाचीही वाट न पाहता मैदानाबाहेर चालायला सुरुवात केली.
WICKET! Steve Smith so plumb lbw against Tahir that he walks before the umpire's finger goes up! @BIMTridents 119/3 after 14 overs, with Shai Hope still going strong on 68.#GAWvBT #CPL18 #Biggestpartyinsport
— CPL T20 (@CPL) August 12, 2018
त्याच्या या खिलाडूवृत्तीचे कौतुक होत आहे. स्मिथने या सामन्यात 37 चेंडूत 41 धावांची खेळी केली. तसेच त्याने शाय होप बरोबर तिसऱ्या विकेटसाठी 105 धावांची शतकी भागिदारीही केली.
बार्बाडोसकडून होप आणि स्मिथने अनुक्रमे 88 आणि 41 असे सर्वाधिक धावा केल्या. या दोघांच्या खेळीच्या जोरावर बार्बाडोसने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 185 धावा करत गयाना ऍमेझॉन वॉरियर्ससमोर 186 धावांचे विजयासाठी लक्ष्य ठेवले.
मात्र बार्बाडोसकडून रेमोन रेफरने घेतलेल्या 5 विकेट्समुळे वॉरियर्सला 20 षटाकात 155 धावांवर रोखण्यात बार्बाडोसला यश आले. बार्बाडोसने हा सामना 30 धावांनी जिंकला.
स्मिथ मार्चमध्ये दक्षिण आफ्रिका-आॅस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान झालेल्या चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर क्रिकेट आॅस्ट्रलियाने एक वर्षाची बंदी घातली आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये होणार हे दोन मोठे बदल
–सचिन तेंडूलकरला अर्जूनमुळे बीसीसीआयच्या कमिटीची द्यावा लागणार राजीनामा?
–सलग दोन दिवस दोन सामने खेळल्याने तूम्ही मरणार नाही; आॅस्ट्रेलियाच्या दिग्गजाने टीम इंडियाला सुनावले