भारतीय महिला टी-२० संघाची उपकर्णधार कर्णधार स्म्रीती मंधाना ही आज आपला २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. ती सध्या इंग्लडमध्ये आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देणाऱ्या स्म्रीती मंधानाला पाहून अनेक युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवणाऱ्या स्म्रीती मंधानाने वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी राज्याच्या १५ वर्षाखालील संघात स्थान मिळवले होते.
स्म्रीती मंधानाने २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील तिने आपल्या आक्रमक फलंदाजीने दिग्गज गोलंदाजांचा घाम काढला. स्म्रीतीने २०१६ मध्ये आयसीसीच्या महिला संघात स्थान मिळवले होते. असा कारनामा करणारी देखील ती पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली होती. तर २०१८ मध्ये तिला ‘बेस्ट महिला क्रिकेटर ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळाला होता.(Smriti mandhana Birthday special, Indian women’s cricket team capitan born on this day)
स्म्रीती मंधानाने भारतीय महिला संघाला २०१७ विश्वचषक स्पर्धा आणि २०२० टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहचवण्यात मोलाचे योगदान दिले होते. स्म्रीतीने ऑस्ट्रेलियाची प्रसिद्ध टी-२० लीग स्पर्धा बिग बॅश लीगमध्ये देखील धावांचा पाऊस पाडला आहे. तसेच आगामी द हंड्रेड स्पर्धेत देखील ती खेळताना दिसून येणार आहे.
मुंबईत जन्म घेतलेल्या स्म्रीती मंधानाने आपला भाऊ आणि वडिलांना पाहून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तिने वयाच्या ९ व्या वर्षी महाराष्ट्राच्या १५ वर्षाखालील संघात आणि ११ व्या वर्षी महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील संघात स्थान मिळवले होते. ती २०१३ मध्ये जास्त चर्चेत आली होती, जेव्हा वेस्ट झोन १९ वर्षांखालील स्पर्धेत १५० चेंडूत २२४ धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे लिस्ट ए क्रिकेटमध्ये दुहेरी शतक झळकावणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.
हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्या स्म्रीती मंधानाला २०१४ मध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे तिला १२ वीची परीक्षा देता आली नव्हती.
स्म्रीती मंधानाची कारकीर्द
स्म्रीती मंधानाने आपल्या कारकीर्दीत एकूण ५९ वनडे सामने खेळले आहेत. यात तिने ४३.७ च्या सरासरीने २२५३ धावा केल्या आहेत. या दरम्यान तिने १८ अर्धशतक आणि ४ शतक झळकावले आहे. तसेच ८१ टी-२० सामन्यात तिने २६ च्या सरासरीने १९०१ धावा केल्या आहेत. यासह ३ कसोटी सामन्यात तिने ३३.४ च्या सरासरीने १६७ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
झेल पकडताना २ खेळाडूंची आपापसांत टक्कर, तरीही पठ्ठ्यांनी टिपला अप्रतिम झेल; पाहा कसं?
श्रीलंका संघातील ‘या’ ४ खेळाडूंकडून भारतीय संघाला धोका! काही क्षणातच पालटू शकतात सामना
बाप बाप असतो! मुलीपासून वेगळा राहत असला तरीही शमीच्या बड्डेदिनी लाडक्या लेकीला ‘खास’ शुभेच्छा






