लाईव्ह क्रिकेट सामन्यात धाव घेत असताना किंवा क्षेत्ररक्षणादरम्यान खेळाडूंमध्ये टक्कर झाल्याचे बरेचसे प्रसंग आपण पाहिले आहेत. इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील पहिल्या टी२० सामन्यातही अशीच घटना घडली. इंग्लंडच्या एका खेळाडूचा झेल पकडताना पाकिस्तानचे दोन क्षेत्ररक्षक एकमेंकाना धडकले आणि मैदानावर पडले. १६ जुलै रोजी नॉटिंघम येथे झालेला हा सामना ३१ धावांनी जिंकत पाहुण्या पाकिस्तानने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
तर झाले असे की, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना यजमान इंग्लंडला २३२ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. त्यांचे दोन्ही सलामीवीर ४२ धावांवर माघारी परतले होते. त्यामुळे अष्टपैलू मोईन अली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. परंतु पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद हसनैनने त्याला एक षटकही खेळू दिले नव्हते.
हसैनन डावातील पाचवे षटक टाकत होता. त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अलीने जबरदस्त पुल शॉट खेळला होता. परंतु चेंडू हवेत जास्त उंच गेल्याने सीमारेषेपर्यंत पोहोचू शकला नाही. यावेळी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस राऊफ चेंडू झेलण्यासाठी चेंडूकडे पाहात त्याच्या दिशेने पळत होता. राऊफबरोबर सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेला शोएब मकसूदनेही चेंडूच्या दिशेने धाव घेतली होती. परिणामी त्यांची आपापसांत धडक झाली.
सकारात्मक बाब अशी की, राऊफने धडक होण्यापुर्वीच झेल पकडला होता. राऊफने मोठी डाईव्ह मारत झेल टिपला होता. परंतु त्याला आपला तोल न सावरल्याने तो पुढून येत असलेल्या मकसूदच्या अंगावर पडला होता. या २ क्रिकेटपटूंमध्ये झालेल्या मजेशीर धडकेचा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
This think this catch of year by Haris Rauf. #ENGvsPAK https://t.co/PYV0QqrKHg pic.twitter.com/2H4pylFxD3
— باسط (@Basit_Newbie) July 16, 2021
दरम्यान वनडे मालिकेतील मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तानने टी२० मालिकेतील पहिलाच सामना जिंकत रणसिंग फुंकले आहे. सलमीवीर मोहम्मद रिझवान (६३ धावा) आणि कर्णधार बाबर आझम (८५ धावा) यांच्या अर्धशतकी खेळीमुळे पाकिस्तानने २३२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोनने ४३ चेंडूंमध्ये १०३ धावांची तूफानी खेळी केली होती. परंतु शादाब खान आणि शाहिन आफ्रिदीने प्रत्येकी ३ विकेट्स घेत १९.२ षटकात इंग्लंडला २०१ धावांवर रोखत सामना जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका संघातील ‘या’ ४ खेळाडूंकडून भारतीय संघाला धोका! काही क्षणातच पालटू शकतात सामना
श्रीलंकेच्या नवनियुक्त कर्णधाराने फुंकले रणसिंग; म्हणाला, ‘युवा खेळाडूंमुळे आम्हाला असा होणार फायदा’
कर्णधार धवन म्हणाला, कोहली अन् शास्त्रींच्या ‘खास खेळाडू’ला श्रीलंकेत खेळवणार; पण कोण आहे तो?