भारतीय पुरुष संघ न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहे. तर तिथेच दुसरीकडे सात वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आले. या संघात अनेक नवीन खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या चुरशीच्या सामन्यानंतर भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना ही चर्चेत आली आहे. पण ही चर्चा मोठ्या खेळीमुळे नसून तिच्या लूक्समुळे रंगली आहे.
व्हायरल झाले स्म्रीती मंधानाचे फोटो
स्म्रीतीने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात ७८ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात तिला फक्त ८ धावा करण्यात यश आले. या सामन्यादरम्यानचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या लूक्सची प्रशंसा करताना थांबत नाहीत. एका चाहत्याने तिला ‘बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा अधिक सुंदर’ असल्याचे सांगितले आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या लूक्सची वेगवेगळ्या पद्धतीने प्रशंसा केली आहे.
Smriti Mandana Without Mekeup > Bollywood Actress Without Mekeup. pic.twitter.com/HCYpVhVBWI
— 𝘽𝘼𝙏𝙈𝘼𝙉 (@TryingSilent) June 19, 2021
Smriti mandana ❤️@Indiancricket86 @mandhana_smriti
#Cricket #cricketlovers pic.twitter.com/iC1pbmg7Mm— Indian cricket (@Indiancricket86) June 18, 2021
Smriti Mandana 😘😘😍😍😍 pic.twitter.com/SiVPDXiKaQ
— JR NTR – ViratKohliᴿᴿᴿ (@Vinodbaadshah18) June 17, 2021
https://www.instagram.com/p/CQTgDcCt8q1/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CQQR6CTNCMr/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CQS3V07NuDI/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CQWFTbVBJQ_/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CQOgTYhBzeu/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CQWChR1rHpW/?utm_source=ig_web_button_share_sheet
https://www.instagram.com/p/CQV_qDhJj9B/?utm_source=ig_web_button_share_sheet
या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात इंग्लंड संघाने ३९६ धावांचा मोठा डोंगर उभारला. त्यांनी ३९६/९ या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला होता. भारतीय महिला संघ पहिल्या डावात २३१ धावा करत सर्वबाद झाला होता. पहिल्या डावात शेफाली वर्मा आणि स्म्रीती मंधानाने अर्धशतकी खेळी केली होती. स्म्रीतीने ७८ तर शेफालीने ९६ धावांची खेळी केली होती.
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात भारताकडून शेफालीने ८३ चेंडूत ६३ धावांची खेळी केली आणि दिप्ती शर्माने १६८ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून पदार्पण करणारी स्नेहा राणाने १५४ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी केली. त्यात १३ चौकारांचा समावेश होता. भारतीय संघाला हा सामना अनिर्णित करण्यात यश आले. या सामन्याची सामनावीर म्हणून आपल्या फलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजीची तोडफोड करणारी शेफाली वर्माला निवडण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
आजा नचले! सामना सुरु असतानाच विराट कोहलीला आली नाचण्याची लहर, पाहा व्हिडिओ
थोडीशी गंमत! तब्बल ६ फूच ८ इंच उंची असलेल्या काईल जेमिसनची भर सामन्यात चाहत्यांबरोबर मस्ती
“…त्या दिवशी मी क्रिकेट खेळणे सोडून देईल”, आर अश्विनचे मोठे वक्तव्य