भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये नुकताच कॉमनवेल्थ गेम्सचा पहिला उपांत्य सामना पार पडला. यासामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा धुव्वा उडवत अंतिम सामन्यात आपले स्थान पक्के केले. या सामन्यात भारताची उपकर्णधार स्म्रीती मंधाना हिने झंझावाती अर्धशतक झळकावत भारतासाठी विजयी भुमिका बजावली. त्यानंतर मात्र, स्म्रीतीने भारतीय चाहत्यांना एक विशेष भेट देत सर्वांची मने जिंकली.
भारताने इंग्लंड महिला संघाला सामन्याच्या शेवटच्या षटकात केवळ ४ धावांनी मात देत अंतिम सामन्यात प्रवेश केला. हा सामना संपल्यानंतर भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना मैदानात संघाला समर्थन द्यायला आलेल्या चाहत्यांसोबत वेळ घालवताना दिसली. यावेळी तिने अनेक चाहत्यांसोबत सेल्फी काढत आणि अनेकांना ऑटोग्राफ देत विजयाचा जल्लोष साजरा केला.
Vice-Captain @mandhana_smriti obliging the fans with some selfies ???????? pic.twitter.com/SFOjQn0Yw8
— BCCI Women (@BCCIWomen) August 6, 2022
दरम्यान, भारतीय संघाने या महत्वाच्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्मधार हरमनप्रीतने घेतलेल्या या निर्णयाला सार्थ ठरवण्याची जबाबदारी उपकर्णधार स्म्रीतीने आपल्या खांद्यावर घेतली. तिने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर एक कडक फटका मारत चौकार लगावला. आणि आक्रमक अंदाजात केवळ २३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. स्म्रीती भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिला संघासाठी सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारी खेळाडू ठरली आहे. याआधी हा विक्रम तिच्याच नावावर होता. शिवाय भारतीय फलंदाज जेमिमिहा रॉड्रिगेज हिने देखील नाबाद ४४ धावांची तुफानी खेळी करत भारताला १६४ धावांपर्यंत पोहचवले.
१६५ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडसंघाची सुरुवात आक्रमक झाली. मात्र, सामन्याच्या शेवटच्या काही षटकांत भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी धावांवर लगाम लावला आणि इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव निर्माण करत शेवटी सामना खिशात घातला. आता भारतीय संघाचा सामना रविवारी (७ ऑगस्ट) दुसऱ्या उपांत्य सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघासोबत होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारत कॉमनवेल्थ गेम्समधील पहिल्या महिला क्रिकेट स्पर्धेतील सुवर्णपदक आपल्या नावे करण्याच्या तयारीत उतरेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कार्तिकला वाटतेय या गोष्टीची खंत; म्हणाला, “मी खूप आधीच…”
काय सांगता ! एशिया कपसाठी पाकिस्तानच्या दिग्गजाने भारतीय संघातून थेट ‘या’ स्टार खेळाडूलाच वगळले
कॉमवेनल्थ गेम्समधील इतर खेळडूंना भेटला भारतीय महिला क्रिकेट संघ, खास मुद्यांवर झाली चर्चा






