पुणे। मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून गत विजेत्या महात्मा गांधी काशी विद्यापीठ संघाला ३-२ गोलने पराभवाचा धक्का देत एसएनबीपी २८ व्या नेहरू अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेत सर्वांना चकित करून टाकले. दुसरीकडे सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने एसआरएम विद्यापीठ चेन्नई संघाचा ९-० गोलने धुव्वा उडविला. या स्पर्धेसाठी एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युट मुख्य प्रायोजक आहेत.
असोसिएशन ऑफ इंडियन युर्निर्व्हसिटीजच्या मान्यतेने व एसएनबीपी ग्रुप ऑफ इस्टिट्युटच्यावतीने पिंपरी येथिल मेजर ध्यानचंद हॉकी पॉलीग्रास स्टेडियमच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने क गटातील आपल्या पहिल्या लढतीत दमदार सुरूवात केली. त्याच्या तालेब शहाने उत्कृष्ट ड्रिब्लिंग आणि आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून १० व्या, २० व्या व ५४ व मिनिटाला तीन गोल करून आपल्या संघाच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. पुणे संघाच्या प्रत्वल मोहोरकर (९ व्या. व ४८ व्या. मि.) व रोमेश पिल्लेने (२३ व्या. व ५१ व्या मि.) प्रत्येकी दोन गोल करून चांगली साथ दिली. पुण्याकडून वेंकटेश केंचे (३० व्या मि.) आणि प्रणव माने (४३ व्या. मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.
ड गटातील सामन्यात गतविजेत्या एमजीके वाराणसी विद्यापीठ संघाच्या खेळाडूंनी सुरूवात तर चाांगली केली होती. त्यांच्या मैतैय मोयरंगथेम धनंजोयने सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे आपल्या संघाला एक गोलची आघाडी मिळून दिली. पण या गोलचा आनंद त्यांना जास्त वेळ घेता आला नाही. मुंबई विद्यापीठ संघाच्या मनप्रीत सिंगने ५ व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला बरोबरी साधून दिली.
त्यानंतर एमजीके विद्यापीठच्या समर्थ प्रजापतीने २५ व्या मिनिटाला आपल्या संघाचा दुसरा गोल करून पुन्हा आघाडी मिळवून दिली. नंतर मुंबई संघाच्या मनप्रीत सिंगने ३२ व्या मिनिटाला गोल करून पुन्हा बरोबरी साधली. लगेचच ३८ व्या. मिनिटाला मुबंईच्या जय धनवडेने आपल्या संघाचा तिसरा गोल काडी मिळवून दिली. पण नंतर एमजीके संघाच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्याचा शेवट पर्यंत प्रयत्नकेला, पण मुंबई संघाच्या बचव फळीच्या खेळाडूंनी त्याचे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडले.
निकाल (साखळी फेरी):
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : ९ गोल (प्रज्वल मोहारकर ९ व ४८ व्या मि., तालेब शहा १० व्या, २० व्या. व ५४ व्या. मि., रोमेश पिल्ले २३ व ५१ व्या मि., वेंकटेश किंचे ३० व्या मि., प्रणव माने ४३ व्या. मि.) वि. वि. एसआरएम विद्यापीठ चेन्नई : शून्य गोल.
मुंबई विद्यापीठ : ३ गोल (मनप्रित सिंग ५ व्या व ३२ व्या मि., जय धनवडे ३८ व्या. मि.) वि. वि. महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणासी : २ गोल ( मैतैय मोयरंगथेम धनंजोय ३ ºया मि., समर्थ प्रजापती २५ व्या. मि.)
महत्त्वाच्या बातम्या –
पीवायसी रिबाऊंड रॅकेट लीग २०२२ स्पर्धेत कुकरीज, मस्किटर्स संघांची विजयी सलामी
कमाईचे सगळे रेकॉर्ड मोडण्यासाठी आयपीएल १५ सज्ज; बीसीसीआय करणार तब्बल ८०० रुपयांची कमाई?