पुणे १ ऑक्टोबर २०२३ ः सॅम्युएलच्या आठ गोलच्या जोरावर राऊंड ग्लास अकादमी संघाने एसएनबीपी १६ वर्षांखालील मुलांच्या हॉकी स्पर्धेत अन्वर हॉकी सोसायटी संघावर २७-० असा दणदणीत विजय मिळविला. अन्वर हॉकी संघ गेल्यावर्षी तिसऱ्या क्रमांवकावर आला होता, तर राऊंड ग्लास संघ स्पर्धेत प्रथमच खेळत आहे.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत सॅम्युननएलने नोंदवलेल्या आठ गोलच्या कामगिरीला हर्शजोत सिंग, साजन राजभर आणि दिपकप्रीत सिंगच्या प्रत्येकी चार गोलची साथ मिळाली. जोबन प्रीत सिंग, दमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी दोन, तर गुरज्योत सिंग, अर्षदीप सिंग यांनी एकेक गोल केला.
स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी ६४ गोलांचा पाऊस पडला. तमिळनाडू हॉकी अकादमी संघाने मध्यंतराच्या ५-० अशा आघाडीनंतर रायन इन्स्टिट्यूटचा १७-० असा पराभव केला. एस. मोहन नाथ, के. अजयने प्रत्येकी तीन, तर एन. गौतम, पी. विष्णुवर्धनने प्रत्येकी दोन, टी. गुगन, व्ही. गोकुळ, एस. संजयकरन यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
अन्य एका सामन्यात बोंगीर हॉकी अकादमी संघाने कोलकता वॉरियर्सचा ७-० असा पराभव केला. आकाश सरोज, हर्ष पटेल यांनी प्रत्येकी दोन, तर शिव कनुजिया, शोभित कुमार, अमित यादव यांनी प्रत्येकी एकेक गोल केला.
आर के. रॉय अकागदमी संघाला जय हॉकी अकादमी संघाविरुद्ध १-१ असे बरोबरीवर समाधान मानावे लागले. रॉय अकादमीकडून साकेत प्रधानने एक, तर जय हॉकी अकादमीकडून गाविन रावने गोल केला.
झांशीच्या स्पोर्ट्स हॉस्टेल संघाने प्रल्हाद पांडेच्या तीन गोलच्या जोरावर मुंबईच्या स्कूल स्पोर्टस संघटना संघाचा ९-२ असा पराभव केला. अन्य गोल अनुराग सिंग, शुभांकर सोनकर, अखिलेश यादव, करण धनुक यांनी केले. शिवा सविताने दोन गोल केले. पराभूत संघाकडून दोन्ही गोल शशांक कुमारने केले. (SNBP Hockey. A resounding victory for Round Glass Academy by 27 goals, a record of 64 goals in the tournament on the first day)
महत्वाच्या बातम्या –
Asian Games 2023 । तजिंदरपालने सलग दुसऱ्यांदा जिंकले सुवर्ण, अविनाश साबळेनेही रचाला इतिहास
रोहितचा चाहता बनला पाकिस्ताचा 24 वर्षीय अष्टपैलू, विश्वचषकापूर्वी केलं तोंड भरून कौतुक