पुणे: डेक्कन जिमखाना व महाटेनिस यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए आणि एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या एमएसएलटीए-डेक्कन जिमखाना महाटेनिस एआयटीए 18वर्षांखालील सुपर सिरीज टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात बिगरमानांकीत सोलापूरच्या आकृती सोनकुसरे हिने कर्नाटकाच्या चौथ्या मानांकित प्रेशा शंथामूर्तीचा 6-3, 0-6, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करून आपली विजयी मालिका कायम ठेवली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉ उपांत्यपूर्व फेरीत मुलींच्या गटात अव्वल मानांकित रुमा गायकवारीने क्वालिफायर प्रिशा शिंदेचा 6-0, 6-0 असा सहज पराभव केला. तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या श्रीनिधी बालाजी हिने महाराष्ट्राच्या सेजल भुतडाचे आव्हान 6-1, 6-2 असे सहज संपुष्टात आणले. सहाव्या मानांकित कर्नाटकाच्या एन हर्षिनी हिने महाराष्ट्राच्या आस्मि आडकरला 6-1, 6-0 असे पराभूत केले.
मुलांच्या गटात निशित रहाणे याने पात्रता फेरीतुन मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या अर्णव पापरकरचा 6-2, 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. तिसऱ्या मानांकित अजमीर शेखने अभिराम निलाखेचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव केला. अव्वल मानांकित तेलंगणाच्या तरुण कोरवारने सार्थ बनसोडेचा 6-4, 5-7, 6-2 असा संघर्षपूर्ण पराभव केला. तनिष्क जाधव याने जय दिक्षितचा 6-2, 6-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. दुहेरीत मुलींच्या गटात देवांशी प्रभुदेसाई व सिया प्रसादे यांनी अव्वल मानांकित रुमा गाईकवारी व राधिका महाजन या जोडीचा 6-3, 6-3 असा पराभव केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ(उपांत्यपूर्व फेरी): मुले:
तरुण कोरवार(तेलंगणा)[1]वि.वि.सार्थ बनसोडे(महा) 6-4, 5-7, 6-2;
निशित रहाणे(महा)वि.वि.अर्णव पापरकर(महा) 6-2, 6-0;
अजमीर शेख(महा)[3]वि.वि.अभिराम निलाखे(महा)6-0, 6-0;
तनिष्क जाधव(महा)वि.वि.जय दिक्षित(महा)6-2, 6-2;
मुली:
रुमा गायकवारी[1](महा)वि.वि.प्रिशा शिंदे(महा)6-0, 6-0;
आकृती सोनकुसरे(महा)वि.वि. प्रेशा शंथामूर्ती(कर्नाटक)[4] 6-3, 0-6, 6-3;
श्रीनिधी बालाजी(कर्नाटक)[3]वि.वि.सेजल भुतडा(महा) 6-1, 6-2;
एन हर्षिनी(कर्नाटक)[6]वि.वि.आस्मि आडकर(महा)6-1, 6-0.
दुहेरी: मुले: उपांत्यपूर्व फेरी:
अजमीर शेख/साहिल तांबट[1] वि.वि.सार्थ बनसोडे/सिद्धार्थ मराठे 6-7(3), 6-3, 12-10;
पार्थ देवरुखकर/जय पवार[4] वि.वि.अनिष रांजळकर/अर्जुन अभ्यंकर 6-4, 6-4;
जश शहा/प्रद्युम्न तोमर वि.वि.प्रणव गाडगीळ/यग्ना पटेल[3] 6-4, 6-1;
जय दिक्षित/निशित रहाणे वि.वि.तनिष्क जाधव/तरुण कोरवार[2] 5-7, 6-2, 10-8;
मुली:
देवांशी प्रभुदेसाई/सिया प्रसादे वि.वि.रुमा गाईकवारी/राधिका महाजन[1]6-3, 6-3;
मेह्क कपूर/प्रिशा शिंदे वि.वि.ऐश्वर्या जाधव/आकृती सोनकुसरे 7-5, 3-6, 10-6;
आस्मि आडकर/श्रीनिधी बालाजी[3]वि.वि.मृण्मयी जोशी/श्रुती नानजकर 7-5, 6-2;
एन हर्षिनी/प्रेशा शंथामूर्ती[2]वि.वि.कौशिकी समंथा/डान्सिया फर्नांडो 6-0, 6-3.
महत्त्वाच्या बातम्या-
अश्विनची फलंदाजी ऍक्शन पाहून व्हाल लोटपोट, याआधी कधीही पाहिला नसेल असा बॅटिंग स्टान्स
सासवड एफसीचे जुन्नरविरुद्ध आठ गोल