भारतीय क्रिकेट संघाच्या नवीन निवड समिचीची घोषणा बीसीसीआयकडून लवकरच केली जाऊ शकते. बोर्ड न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधीच सर्व अर्जदरांच्या मुलाखती घेऊन या नियुक्ता करू इच्छित असल्याचे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. सोबतच रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या टी-20 कर्णधारपदाबाबत देखील निर्णय घेतला जाऊ शकतो. मागच्या काही दिवसांपासून निवड समिती आणि टी-20 संघाचे कर्णधारपद यावर चर्चा सुरू आहेत. बोर्ड आता यावर लवकरात लवकरच निर्णय घेण्याच्या प्रयत्नात आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची टी-20 आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. 18 जानेवारी रोजी पहिल्या वनडे सामन्यातून न्यूझीलंडचा हा भारत दौरा सुरू होईल. या मालिकेपूर्वी बीसीसीआयला नवीन निवड (BCCI Selection Committee) समिती बनवायची असून यासाठी अजून वेळ आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयला निवड समिती नियुक्त करायची आहे. पण तत्पूर्वी चेनत शर्मांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती या मालिकेसाठी संघ घोषित करू शकतो.
लवकरच होणाल नव्या निवड समितीची घोषणा –
याविषयी बोलताना एका बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रक्रियेत थोडा वेळ लागू शकतो. आयपीएल लिलावामुळे थोडा उशीर झाली आहे. पण आम्ही हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्याकडे जेवढे अर्ज आले आहेत, ते पाहण्यासाठी किमान 10 दिवसांचा वेळ लागू शकतो. ख्रिसमस झाल्यानंतर आण्ही चेतन शर्मा आणि त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा करून. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही मालिकांसाठी संघ घोषत करण्याची मागणी त्यांच्याकडे केली जाईल. टी-20 कर्णधारपदाविषयी बोलायचे झाले, तर हे मोठे निर्णय आहेत. हा निर्णय घेण्याआधी सारासार विचार करावा लागणार आहे. घाईगडवडीत यावर निर्णय घेता येणार नाही.”
वेंकटेश प्रसाद बनू शकतात निवड समितीचे नवीन अध्यक्ष –
असे असले तरी, बीसीसीआयच्या दुसऱ्या एका सूत्राने अशी माहिती दिली की, “नवीन निवड समितीला अंतिम स्वरूप दिले जात आहे. वेंकटेश प्रसाद सर्वात अनुभवी क्रिकेटपटूंपैकी एक आहेत, ज्यांनी या पदासाठी नाव नोंदवले आहे. यावर कोणतीच ऐपचारिक चर्चा झाली नाहीये. पण निवड समितीच्या अध्यक्षाच्या रूपात वेंकटेश प्रसादांच्या नावावर सर्वांची सहमती येऊ शकते.” (Soon the new selection committee will be announced by BCCI, a big decision will be taken about the T20 captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कर्णधार एक सांगतो अन् खेळाडू करतात एक”, संघ सहकारीच टीम इंडियावर भडकला
पेले यांची तब्येत नाजूक, जवळचे व्यक्ती करतायेत हॉस्पिटलमध्ये गर्दी; मुलीची भावूक पोस्ट व्हायरल