महिला प्रीमियर लीगमध्ये शनिवारी (18 मार्च) रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि गुजरात जायंट्स यांच्यातील रोमांचक सामना पाहायला मिळाला. सोफी डिवाइन या सामन्यात आरसीबीसाठी सर्वात महत्वाची भूमिका बजावू शकली आणि तिने संघाला विजय देखील मिळवून दिला. एवघी एक धाव कमी पडल्याने सोफीचे शतक हुकले. दरम्यान, ती आरसीबी फ्रँचायझीची दुसरी खेळाडू ठरला आहे, जिने 99 धावांवर विकेट गमावली. दिग्गज विराट कोहली यानेही आरसीबीसाठी खेळताना अशा निराशेचा सामना केला होता.
WHAT. AN. INNINGS. 🔥
The whole stadium applauds! We are in disbelief but Sophie has to depart. 💔#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2023 #RCBvGG pic.twitter.com/JRWFztHO1i
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 18, 2023
कोणत्याही क्रिकेटपटूसाठी 99 धावांवर विकेट गमावणे म्हणजे मोठी निराशा असते. शतकाला अवघी एक धाव गरजेची असताना कोणताही फलंदाज विकेट गमावू इच्छित नसतो. पण दुर्दैवाने अशी वेळ आतापर्यंत अनेक खेळाडूंवर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Virat Kohli) फ्रँचायझीच्या दोन खेळाडूंना अशा प्रकारे आपल्या डावाच दुर्दैवी शेवट केला. शनिवारी गुजरात जायंट्स संघाविरुद्ध खेळताना सोफी डिवाइन (Sophie Devine) सलामीला आली. आरसीबीसाठी तिने वादळी खेळी केली, पण शतक मात्र करू शकली नाही. सोफीने अवघ्या 36 चेंडूत 99 धावा साकारल्या. यादरम्यान तिचा स्ट्राईक रेट 275 होता.
RCB players to get dismissed on 99
2013: Virat Kohli vs Delhi
2023: Sophie Devine vs Gujarat— The Cricket Panda (@TheCricketPanda) March 18, 2023
यापूर्वी आरसीबी पुरुष संघासाठी खेळताना विराटने 99 धावांवर विकेट गमावली होती. आयपीएल 2013 मध्ये विराट कोहली आरसीबीटी फलंदाजी करत होता. विरोधात दिल्ली कॅपिटल्स (तेव्हाचा दिल्ली डेअरडेव्हल्स) संघ होता. विराटने या सामन्यात 99 धावांची महत्वपूर्ण खेळी केली, पण शतक पूर्ण करण्याआधीच विकेट गमावून बसला. शनिवारी सोफी डिवाईनने 99धावांवर विकेट गमावल्यानंतर आरसीबी चाहत्यांना 2013 साली विराटने 99 धावांवर गमावलेली विकेट आठवली.
A BREATHTAKING CHASE! 😮💨
A mammoth total gunned down with 27 deliveries to spare 🤌
✌wins in ✌games! We love this team 🥹❤#PlayBold #ನಮ್ಮRCB #SheIsBold #WPL2023 #RCBvGG pic.twitter.com/1WoZ3n6N4H
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 18, 2023
दरम्यान, आरसीबी आणि गुजरात जायंट्स यांच्यातील हा सामना मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळला गेला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 4 बाद 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात आरसीबीची कर्णदार स्मृती मंधाना आणि सोफी डिवाइन डावाची सुरुवात करण्यासाठी आल्या. मंधानाने 37, तर डिवाइनने 99 धावा कुटल्या. परिणामी आरसीबीने हे मोठे लक्ष्य अवघ्या 15.3 षटकांमध्ये गाठले. सोफीला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.
(Sophie Devine is the second player after Virat Kohli to lose wicket on 99 runs while playing for RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
डिवाईनच्या वादळात उडाली गुजरात! 189 धावांचा आरसीबीकडून यशस्वी पाठलाग
विराटचा येणार बायोपिक? ‘या’ साऊथ सुपरस्टारने व्यक्त केली मुख्य भूमिका निभावण्याची इच्छा